Dairy Products
Dairy Products Agrowon
ॲग्रोमनी

भारताची दुग्ध उत्पादन निर्यात ५५२ दशलक्ष डॉलर्सवर !

Team Agrowon

भारतीय दुग्ध उत्पादनांच्या (Dairy Products) यावर्षातील निर्यातीने गेल्या आठ वर्षांतील विक्रमी पल्ला गाठला आहे. जागतिक बाजारातील दरवाढ अन वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारताची दुग्ध उत्पादनांची निर्यात ५५२ दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे.

या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या काळात) दुग्ध उत्पादनांची (Dairy Products) निर्यात १.७० लाख टनांवर गेली आहे. भारतीय आकडेवारीत सांगायचे झाल्यास आर्थिक वर्षातील ११ महिन्यात भारताने ४११५ कोटी रुपयांची दुग्ध उत्पादने (Dairy Products) निर्यात केली आहेत. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारताने दुग्ध उत्पादनांच्या निर्यातीतून (Dairy Products) २१२२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यंदा त्यात ९४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा दूध व दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रातील सहकारी आणि खाजगी घटकांनी यंदा निर्यातवाढीसाठी जोर लावला असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये भारताची दुग्ध उत्पादनांची निर्यात अशी जोमाने झाली असल्याची नोंद आहे. २०१४ ला भारताने दुग्ध उत्पादनांच्या (Dairy Products) निर्यातीतून ७२७ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

भारताच्या दुग्ध उत्पादनांच्या निर्यातीत स्किम्ड मिल्क पावडरच्या वाटा मोठा ठरला आहे. याशिवाय अन्य मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांनाही चांगली मागणी असल्याचे गुजरातच्या सहकारी दूध विपणन महासंघाचे (Gujarat Co-operative Milk Marketing Federation) व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी म्हटले आहे.

पशुखाद्य आणि खतांच्या वाढत्या किंमतीमुळे दुग्ध उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांचे दुधाचे उत्पादन घटले. त्यामुळे भारतीय दुग्ध उत्पादनांना जागतिक बाजारात मागणी वाढली. प्रतिकूल हवामानामुळे न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियातील दुधाचे उत्पादन घटले. प्रमुख दुग्धजन्य उत्पादक देशांमधील उत्पादनात झालेल्या घटीचा फायदा भारताला झाला आहे. अमेरिका, बांगलादेश सौदी अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि मलेशियामधून भारतीय दुग्ध उत्पादनांची (Dairy Products) निर्यात वाढल्याचेही सोधी यांनी नमूद केले आहे.

वाढत्या मागणीचा लाभ घेत गुजरात, कर्नाटकातील सहकारी दूध महासंघाने निर्यातवाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. भारतीय दुग्ध उत्पादनांची निर्यात वाढली असली तरी देशांतर्गत साठ्यात फारसा फरक पडलेला नाही.

भारताकडे स्किम्ड मिल्क पावडरसह अन्य सर्व उत्पादनांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. देशांतर्गत मागणी भागवून अन्य काही देशांना दुग्ध उत्पादने निर्यात करण्यापुरता साठा भारताकडे असल्याचे सोधी यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

SCROLL FOR NEXT