Parbhani News: ‘‘पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपये आणि जमीन खरडून गेलेल्यांना प्रति हेक्टरी दोन लाख मदत मिळेपर्यंत संघर्ष चालूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेने म्हटले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असून, या विरोधात आज (ता. ९) रस्ता रोको आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले..महाराष्ट्र राज्य किसान सभेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पीकविमा कंपन्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. लागवड खर्चसुद्धा निघणार नाही अशी १८ हजार पाचशे रुपयांची घोषित केली गेली आहे. .Farmers Protest: तर शेतकऱ्यांची क्रांती सरकारला रोखता येणार नाही ः तुपकर.प्रत्यक्ष मदत देताना आणखी ५० टक्के नुकसान धरून पूरग्रस्तांना पुन्हा निम्म्याच मदतीत ढकलायचे. हा प्रकार महाराष्ट्र किसान सभा चालू देणार नाही. या आपत्तीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला संपूर्ण नुकसान भरपाई आणि मदत देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी विरोधी पक्ष आणि आंदोलक यांना विश्वासात घेऊन संपूर्ण नुकसान भरपाई आणि मदत देण्याचे धोरण सरकारने ठरविणे आवश्यक आहे..Farmer Protest: ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन.या तथाकथित उपाय योजनेत शेतकरी, शेतमजूर, बटाईदार शेतकरी, पशुपालक, मच्छिमार, कारागीर, छोटे व्यावसायिक यांच्या मदतीसाठी थातूरमातूर उपाययोजना करून फसवणूक करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बटाईदार शेतकऱ्यांची शासनाने नोंदही केली नाही. सर्वेक्षणही केले नाही..संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण सुमारे २७ टक्के आहे. त्यांना कोणत्याही मदतीत स्थान दिलेले नाही. पूरग्रस्त झालेल्या गावात माती वाहून गेलेल्या ठिकाणी प्रशासनाने नोंदी केल्या नाहीत. पंचनामेही केले नाहीत. केवळ पीक नुकसानीच्या मोघम नोंदीवर शेतकऱ्यांची ससेहोलपट चालविली आहे. सरकारने ही मदत केवळ पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली. प्रत्यक्षात ही मदत शेतकऱ्यांना कर्जाच्या खोल गर्तेत ढकलणारी आहे. हे शासकीय आकडेवारीवरून खालील तक्त्यावरून स्पष्ट होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.