Amravati News: अमरावती जिल्ह्यातील २०२५-२६ च्या खरीप हंगामात ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांना १३७४.४७ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. मात्र पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आता परतफेडीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यात एकूण लक्ष्यांकाच्या ८३ टक्के कर्ज वितरण झाले..जिल्हा बॅंकिंग समितीकडून यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांना १६५० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. एक एप्रिलपासून कर्ज वितरणास प्रारंभ झाला, तर ३० सप्टेंबरला वितरण संपुष्टात आले. या कालावधीत ९४ हजार ६६४ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले..Crop Loan : सांगलीत खरीप हंगामासाठी १४६७ कोटी पीककर्ज वाटप.या शेतकऱ्यांना १३७४.४७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. पेरणीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता परतफेडीची चिंता लागली आहे. यंदा जुलै व ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनाची सरासरी घटण्याची शक्यता अधिक आहे..बाजारात शेतपिकांचे दर हमीदारापेक्षाही कमी आहेत. हाती येणाऱ्या उत्पादनातून लागवड खर्चही निघण्याची शक्यता कमी असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. शासकीय खरेदीत सातबाऱ्यावर नोंद होत असल्याने मिळणाऱ्या पैशांतून बॅंका कर्जवसुली करीत असल्याने नेमके हाती काय लागणार, याचा हिशेब लावत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे..Crop Loan Fraud : ‘बनावट सात-बाराचा वापर करून पीककर्जाची उचल’.बॅंकनिहाय लक्ष्यांक व वितरणबॅंक लक्ष्यांक सभासद प्रत्यक्ष वितरण शेतकरी संख्याराष्ट्रीय ८७१ ७४,९०० ६६९.८७ ४३,२०९खासगी १३० १०,४०० ४५.८५ १५६८ग्रामीण २१ २५६० ११.५८ ९८२जिल्हा मध्यवर्ती ७५० १,२५,००० ६४७.१७ ४८,९०५.पीककर्जाचे लक्ष्यांक व वितरणएकूण लक्ष्यांक : १६५०सभासद संख्या : २,२५,०००प्रत्यक्ष वितरण : १३७४.४७शेतकरी संख्या : ९४,६६४(आकडे : कोटी रुपयांत).देशात शेतीमालाचे अधिक उत्पादन झाले त्या काळात संबंधित शेतीमालाची आयात करायची. या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही असा प्रयत्न सरकारकडून आजवर झाला आहे. भरपाईच्या नावावर देखील शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली. पाय करकचून बांधायचे आणि शर्यतीत पहिला येण्याची अपेक्षा करायची असे धोरण शासनाने शेतकऱ्यांप्रती अवलंबिले आहे.मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.