Soybean Cotton Rate Agrowon
ॲग्रोमनी

Cotton, Soybean Rate : ॲग्रोवनमुळं कापूस, सोयाबीनचे भाव पडले का?

अॅग्रोवन मागील काही वर्षांपासून शेतीमाल बाजाराची अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोचवतंय. पण बाजारात अॅग्रोवनच्या अंदाजावरून गैरसमज पसरवले जात आहेत.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः अॅग्रोवन मागील काही वर्षांपासून शेतीमाल बाजाराची अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोचवतंय. पण बाजारात अॅग्रोवनच्या अंदाजावरून गैरसमज पसरवले जात आहेत.

काहीजण अॅग्रोवनच कापूस (Cotton) आणि सोयाबीनचे भाव (Soybean Rate) पाडतंय, असं म्हणतात. तर अॅग्रोवनच्या अंदाजामुळं शेतकरी कमी दरात माल विकत नाहीत, त्यामुळं बाजारातील आवक कमी असून उद्योगांचा तोटा होतोय, असा अपप्रचार काही व्यापारी करत आहेत.

पण यंदाच्या हंगामात कापूस आणि सोयाबीन दराचा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.

शेतीचं उत्पादन घेणं जसं जोखमीच बनलं तसं शेतीलाचा बाजारही काहीसा जोखमिचाच आहे. बाजारात सतत बदल होत असतात.

मागणी आणि पुरवठा, निर्यात, आयात, सरकारी धोरण, गुंतवणूक, नफेखोरी, तसच नैसर्गिक घटनांचामुळंही बाजारावर लगेच परिणाम होतो.

त्यामुळं मोठे चढ उतार होतात. तसच भारतातील शेतकरी शेतीमाल हाती आल्यानंतर पहिल्या तीन ते चार महिन्यांमध्येच विकतात. चांगला भाव मिळेपर्यंत माल रोखून धरण्याची आर्थिक क्षमता खूपच कमी शेतकऱ्यांची असते.

व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार, निर्यातदार आणि नफेखोर हे चांगलेच ओळखून आहेत.

शेतकऱ्यांच्या हातून माल बाहेर येईपर्यंत बाजारात मोठी तेजी येत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हातून माल या संघटीत घटकांच्या हाती आल्यानंतर नफा कमावला जातो.

एखाद्या वर्षी असाधारण गोष्टी घडल्या तरच शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. जसं मागीलवर्षी कोरोनामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मागीलवर्षी त्यामुळं कापूस आणि सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. पण यंदा तशी परिस्थिती नाही.

यंदा बाजारासाठी सर्वसाधारण वर्ष समजले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांकडून कमीत कमी दरात कापूस आणि सोयाबीन तसंच इतर शेतीमाल कमीत कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांना चांगाल भाव मिळायचा असेल तर त्यांना बाजाराची योग्य माहिती आवश्यक आहे. यंदा कापूस तसं सोयाबीनचा शेतीमालाची मागणी आणि पुरवठा कसा राहील? आयात, निर्यात आणि सरकारची धोरणं तसंच त्यांचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याचा अचूक अंदाज आवश्यक असतो. नेमकं हेच काम अॅग्रोवन करत आहे.

अॅग्रोवन मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना बाजाराची अचूक माहिती देत आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेऊन बक्कळ नफा कमावणाऱ्या घटकांच्याच हाती बाजार आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांनी माल रोखून धरून चांगल्या दराची अपेक्षा करणं किंवा बाजार आपल्या हाती घेणं या घटकांना पचणारं नाही. त्यामुळं काही करुन बाजार आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न तर होणारच. त्यासाठी सरकारवरही दबाव आणला जातो.

बाजारात कृत्रिम मंदी आणली जाते. बर या मंदीचा आधी अंदाज येत नाही. तसंच अचानक घडणाऱ्या घटनांचाही अंदाज आधीच लावता येत नाही.

यंदा अॅग्रोवनने सुरुवातीपासूनच कापूस आणि सोयाबीन बाजाराचा अचूक अंदाज दिला आहे. कापसाचे भाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतील, असं अगदी सप्टेंबरपासून सांगितलं.

सरुवातीला अनेक युट्यूब चॅनल्स, तथाकथित जाणकार आणि व्यापारी तसंच उद्योगही ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव राहतील, असे सांगत होते.

कापसाचा अंदाज
खरचं चुकला का?

नोव्हेंबरमध्ये कापूस ९ हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाजही अॅग्रोवनने सप्टेंबर महिन्यातच दिला होता. दर ९ हजार रुपयांच्या पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी या भावात कापसाचे एक किंवा दोन टप्पे विकावेत, असा स्पष्ट सल्ला दिला होता.

पण नेमकं याच काळात तथाकथित जाणकार, युट्यूब चॅनल्स आणि काही शेतकरी १२ ते १५ हजारांपर्यंत भाव जातील, त्यामुळं कापूस विकू नका, असा अपप्रचार केला. त्यावेळीही शेतकऱ्यांनी या लोकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असा सल्लाही अॅग्रोवनने दिला  होता.

पण दुर्दैवानं अनेक शेतकरी या अपप्रचाराला बळी पडले. अॅग्रोवनने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीचा सल्ला दिला होता.

वेगवेगळ्या दरात कापूस विकल्यास तेजीचाही फायदा घेता येतो, हे सतत सांगितलं. अनेक शेतकऱ्यांनी यानुसार विक्रीही केली.

डिसेंबरमध्ये दरात चढ उतार राहिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये काही दिवस कापसाची भावपातळी ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान झाली होती.

या दरात एक टप्पा विकावा, असंही अॅग्रोवनने सांगितले होतं. आता बाजारात दर काहीसे नरमले आहेत. सध्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये, असा स्पष्ट संदेश अॅग्रोवनने दिला.

अॅग्रोवनच्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांनी वाढलेल्या दरात कापूस विकला. तसंच दर पडलेल्या काळात शेतकऱ्यांनी कापूस रोखला.

त्यामुळं काही व्यापारी तसंच इतरांचा सल्ला ऐकून तोट्यात गेलेले शेतकरी अॅग्रोवनमुळे तोटा होत असल्याचा अपप्रचार करत आहेत. अॅग्रोवनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, उद्योग बंद पडले असा आरोप केला जातोय.

पण शेतकरी कमी भावात कापूस विकत नाहीत, हेच मूळ दुखणे आहे. दरवर्षीप्रमाणं यंदा शेतकरी लगेच कापूस विकत नाहीत. अॅग्रोवन बाजाराचा अंदाज देत असल्यानं शेतकऱ्यांनी विक्रीची पद्धत बदलली. याचा खरा राग या मंडळांना आहे.

सोयाबीनचे अंदाज काय आहेत?
तसंच सोयाबीन बाजाराविषयीही शेतकऱ्यांना अचूक माहिती दिली आहे. यंदा सोयाबीनची दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असं अॅग्रोवनने ऑक्टोबर महिन्यापासून सांगितलं.

काही लोक ८ हजारांपर्यंत दर जातील असं सांगत होते. पण अॅग्रोवनने अवास्तव दरपातळी कधीच सांगितली नाही. यंदाच्या हंगामात सोयाबीन अॅग्रोवनने सांगितलेल्या दरपातळीच्या दरम्यानच आहे.

शेतमाल विक्रीचं नियोजन कुठं चुकतं?
शेतीमालाचा भाव सतत वाढावा ही अपेक्षा ठिक आहे, पण बाजारात असं घडत नाही. काही वेळा अचानक घडणाऱ्या घटनांमुळं बाजार नरमतो, दर कमी होतात.

पण या काळात धीर धरणं गरजेचं असतं. पण याच काळात शेतकरी कुणाला तरी दोष देऊन कमी दरात माल विकतात. वाढलेल्या दराचा फायदा घायचा असेल तर वाट पाहावी लागते.

दर किती वाढतील? कधी कमी होऊ शकतात? याचा अंदाज आल्यानंतर वाढलेल्या दरात माल विकायचा असतो. पण शेतकरी दर वाढले की आणखी दरवाढीची वाट पाहतात. मग बाजार नरमला की दर आणखी कमी होण्याच्या भीतीने कमी भावात माल विकतात.

हा अनुभव सध्याही येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजार समजून घेणं गरजेचं आहे. बाजारातील चढ उतार होणारच, तेजी मंदी येणारचं, नफेखोरी होणारच, साठेबाजीही होणारचं हे गृहित धरून कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता चांगला दर पदरात पाडून घ्यावा, हीच अॅग्रोवनची अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT