Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीनचे दर नरमले

शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन मागे ठेवलं. मात्र मागील काही दिवसांपासून कापूस आणि सोयाबीनचे दर नरमलेले आहेत. आजही बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या.
Soybean Cotton Rate
Soybean Cotton RateAgrowon
Published on
Updated on

पुणे : पिकाचं वाढलेलं नुकसान, तसचं खंत, बियाणं आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळं यंदा कापूस (Cotton rate) आणि सोयाबीनला (Soybean rate) चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन मागे ठेवलं. मात्र मागील काही दिवसांपासून कापूस आणि सोयाबीनचे दर नरमलेले आहेत. आजही बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या.

देशातील कापूस बाजारात मागील ८ ते १० दिवसांपासून काहीसा स्थिर आहे. दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. मात्र मोठी तेजीमंदी नाही.

आज काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल भाव म्हणजेच जास्तीत जास्त भाव क्विंटलमागं १०० रुपयांनी वाढला होता. मात्र सरासरी दरपातळी आजही ८ हजार २०० ते ८ हजार ५०० रुपयांवर कायम होती.

कापसाच्या दरात चढ उतार सुरु असले तरी सरकीचे दर टिकून आहेत. सरकीला आज प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापूस दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सायंकाळपर्यंत वाढत जाणारे दर शेवटच्या टप्प्यात नरमले.

काल सीबाॅटरील वायदे ८३.३३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. क्विंटलमध्ये हा दर १४ हजार ९०० रुपये होतो. तर आज बाजार सुरु झाल्यानंतर दर सुधारले.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत वायदे ८४.२५ सेंटवर पोचले होते. रुपयात हा दर १५ हजार ९७ रुपये होतो.

सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. काल सोयाबीनचे वायदे १५.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते.

रुपयात हा दर ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो. तर सायंकाळपर्यंत वायद्यांनी १५.१५ डाॅलरचा टप्पा गाठला होता. रुपयामध्ये सांगायचं झालं तर वायदे ४ हजार ५१८ रुपयांवर पोचले होते.

Soybean Cotton Rate
Soybean Market: देशातही सोयाबीन दर वाढीसाठी पोषक स्थिती | Agrowon

देशातील सोयाबीन दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र त्यावेळी देशातील सोयाबीन बाजार जागचा हालला नाही.

पण काल दरात मोठी घट झाल्यानंतर देशातील सोयाबीन दरातही घट झाली. आज सोयाबीनचे दर क्विंटलमागं १०० रुपयांनी नरमले होते. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला.

दर वाढण्याचा अंदाज

सध्या देशातील कापूस आणि सोयाबीन बाजारात चढ उतार सुरु आहेत. मात्र जानेवारीच्या शेवटी कापूस आणि सोयाबीनचे दर वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कापसाचे दर ८५०० ते ९५०० रुपयांच्या दरम्यान राहतील. तर सोयाबीनला ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com