Onion Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : दरवाढीनंतर पुन्हा कांदा दरात ५० टक्क्यांनी घसरण

चालू वर्षी उन्हाळ कांद्याला एप्रिल महिन्यापासून तर सप्टेंबरपर्यंत उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळाल्याची स्थिती होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मागणी वाढू लागल्याने दरात हळूहळू सुधारणा दिसून आली.

मुकूंद पिंगळे

नाशिक : चालू वर्षी उन्हाळ कांद्याला (Summer Onion Rate) एप्रिल महिन्यापासून तर सप्टेंबरपर्यंत उत्पादन खर्चाच्या (Onion Production Cost) खाली दर मिळाल्याची स्थिती होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मागणी (Onion Demand) वाढू लागल्याने दरात हळूहळू सुधारणा दिसून आली. दिवाळीनंतर बाजार समित्या पुन्हा गजबजल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला दराने उसळी घेऊन प्रतिक्विंटल २,५०० रुपये दर मिळाला होता. मात्र नंतर तो सातत्याने कमी होत निम्म्यावर येत सरासरी १३०० रुपये पदरी पडत आहे. त्यामुळे केलेला उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

गत रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा उत्पादन वातावरणीय बदलांमुळे अडचणीत सापडल्याची परिस्थिती होती. त्यामुळे एकरी उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत फटका बसला. त्यात आकार, गुणवत्ता व साठवणूक क्षमतेचा अभाव राहिला. असे असताना शेतकऱ्यांनी त्यातील गुणवत्तापूर्ण मालाची प्रतवारी करून साठवणूक केली. मात्र हंगामाच्या अखेर टप्प्यातही दर साधतील, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख बाजार आवारात नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल २,५०० रुपये दर मिळत होता. मागणी कमी होऊन पुरवठा मंदावल्याने दर थेट निम्म्यावर आले आहेत. लासलगाव बाजार समितीत एकच सप्ताहाच्या फरकाने सोमवारी (ता. २१) क्विंटलमागे १,००१ रुपयापर्यंत सरासरी दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (ता. १४) प्रतिक्विंटल २,२०१ रुपये सरासरी दर असताना सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवारी (ता. २१) प्रतिक्विंटल १४०० रुपये सरासरी दर मिळाला.

पिंपळगाव बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवारी (ता. १४) प्रतिक्विंटल १,९५१ रुपये सरासरी दर असताना, सोमवारी (ता. २१) प्रतिक्विंटल १,४५१ रुपये सरासरी दर मिळाला. येथेही क्विंटलमागे सरासरी दरात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. यासह जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची आवक होणाऱ्या उमराणे, नामपूर, देवळा, सटाणा, कळवण, चांदवड, सिन्नर, येवला, मनमाड बाजार समित्यांमध्ये १०५० ते १५७५ रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले.

दर घटण्याची काही कारणे :

-राज्यांत उन्हाळ कांद्याबरोबर खरीप लाल कांद्याची आवक सुरू.

-मध्य प्रदेशात उन्हाळा कांद्याचा अद्याप साठा काही प्रमाणात शिल्लक.

-महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व गुजरात राज्यांत खरीप हंगामातील नव्या मालाची आवक.

-बांगलादेश, श्रीलंका या प्रमुख आयातदार देशांत पुरवठा कमी

बाजार समित्यांमधील दराची स्थिती

बाजार समिती...१नोव्हेंबर...२१ नोव्हेंबर...दरात झालेली घसरण

लासलगाव...२,४७०...१,५०१...९६९

पिंपळगाव बसवंत...२,६५०...१,४५१...१,१९९

उमराणे...१,९००...८५०...१,०५०

देवळा...२,४००...१,०५०...१,३५०

कळवण...२,७७५...१,३००...१,४७५

नामपूर...२,४००...९००...१,५००

सटाणा...२,५००...९२५...१,५७५

सिन्नर...२,६००...१,०५०...१,५५०

चांदवड...२,३५०...९००...१,४५०

नांदगाव...२,३००...८५०...१,४५०

येवला...२,४००...८५०...१,५५०

मनमाड...२,४००...९००...१,५००

राज्यात शेतकऱ्यांकडे साठवलेला कांदा उपलब्ध आहे. अखेरच्या टप्प्यात मध्य प्रदेशातून रब्बी कांदा बाजारात येत आहे. तर इतर मागणी असलेल्या राज्यात स्थानिक बाजारात नवीन खरीप माल येत असल्याने देशावर मागणी कमी होऊन पुरवठा कमी झाल्याने दर कमी झाले आहेत. यंदा बांगलादेश, श्रीलंका येथे आयात शुल्क वाढल्याने निर्यात कमी झाली. त्याचा फटका आहेच.
मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक
मुंगसे (मालेगाव)...२,५००...१,२००...१,३००कांदादरातील सध्याची घसरण झाल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहेत. प्रतिकूल वातावरणामध्ये उत्पादन घेऊनही उन्हाळ कांद्याचे गणित तोट्यात आहे. त्यात शेवटच्या टप्प्यातील शिल्लक मालाची मोठी नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च व उत्पन्नाचे गणित जुळेना अशी वाईट परिस्थिती आहे.
संदीप कोकाटे, कांदा उत्पादक शेतकरी, साताळी, ता. येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT