Chhatrapati Sambhajinagar News: ‘‘शाश्वत शेतीबरोबरच कर्जमुक्त शेतीकडे वळण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रगतिशील शेतकऱ्यांकडून समन्वय व इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी व्यक्त केले..श्री. इंद्रमणी म्हणाले, की शेतकऱ्यांनी विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांबद्दल त्यांचे स्वतःचे अनुभव इतर शेतकरी बांधवांना सांगणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ-संवादावर भर द्यावा. सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा. तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करणे आवश्यक आहे..Crop Loss Compensation : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमुक्त करा .कापूस व इतर पिकातील घन लागवड तंत्रज्ञानाबद्दल प्रसार करणे आवश्यक आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी उत्तम कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली..या कार्यशाळेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. राकेश अहिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, एनएआरपीचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, केव्हीकेतील विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर, डॉ. बी. एल. पिसुरे, डॉ. एस. व्ही. भावर, विशेष कापूस प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक सतीश कदम, जयदेव सिंगल उपस्थित होते..Farmer Protest: कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर, शेतांवर लावणार काळे झेंडे.डॉ. अहिरे म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापेक्षा जालना जिल्ह्याचे रुईचे उत्पादन जास्त आहे. पीक लागवडीमध्ये खतांचा, कीटकनाशकांचा खर्च कमी करावा. माती परीक्षणानुसार पिकांची निवड करून उत्पादन वाढवा व खर्च कमी करावा..श्री. देशमुख म्हणाले, की उत्तम कापूस व्यवस्थापन हा जिव्हाळ्याचा राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी एक लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. पुढच्या काळात स्वच्छ कापूस उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे..डॉ. पवार म्हणाले, की जिल्ह्यानुसार व तालुक्यानुसार पीक पद्धतीत बदल आहे. कमी क्षेत्रावर अधिक निव्वळ नफा असेल अशाच पिकाची लागवड करावी. एका पिकावर अवलंबून राहू नये. डॉ. पाटगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुटकुळे म्हणाले, की कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन करावे. कपाशीतील सर्व कीड व रोगांची माहिती दिली. विशेष कापूस प्रकल्पातील बद्री शेळके, कौतिक मिरगे व श्रीमती शकुंतला घायट यांनी प्रकल्पाबद्दल अनुभव सांगितले. सूत्रसंचालन डॉ. पिसुरे यांनी तर डॉ. जिंतुरकर यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.