Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे भारतीय बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे भारतीय बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. सध्या कापसाला ६९०० ते ७१०० रुपयांचा दर मिळत असून हमीभावाच्या तुलनेत क्‍विंटलमागे ४०० ते ५०० रुपये असे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भारतीय बाजारातील कापसाची प्रत चांगली असून येत्या काळात मागणी वाढल्यास कापसाच्या दरात सुधारणा होईल, अशी शक्‍यता विपणन क्षेत्रातील जाणकार व्यक्‍त करतात.

केंद्र सरकारने कापसाला ७५२१ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. बाजारात मात्र कापसाचे दर दबावात असून ६९०० ते ७१०० रुपयांनी व्यवहार होत आहेत. कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांच्या मते जागतिक बाजारात ८० सेंट एक पाउंड रुई (५० ते ५२ हजार रुपये खंडी) असा दर आहे.

भारतीय बाजारात सरकीचे भाव ४००० रुपयांवरून ३२०० ते ३३०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्याचा परिणाम सरकी ढेपेच्या दरावरही झाला आहे. सरकी ढेप (पेंड) भाव ३२०० वरुन २८०० रुपयांवर घसरल्याचे चित्र बाजारात आहे. येत्या काळात सरकीची आवक वाढल्यास त्यात आणखी घसरण होईल. त्यामुळे सरकी ढेपही दबावात राहण्याची भीती असल्याने त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर होणार असल्याचे जावंधिया यांनी सांगितले.

सध्या भारतीय बाजारात ६९०० ते ७१०० रुपयांनी कापसाचे व्यवहार होत आहेत. वरोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर जिनींग असून त्यांच्याद्वारे सध्या कापसाची खरेदी होत आहे. एका जिनींग व्यावसायिकाकडे रोज सरासरी ३५० क्‍विंटल कापसाची आवक होत असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी कापसाला ६९०० ते ७१०० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

‘सीसीआय’सोबतच आमच्या कांचन शेतकरी उत्पादक कंपनीकडून कापसाची खरेदी केली जात आहे. ओलावा ८ टक्‍केपर्यंत असल्यास सीसीआयकडून ७५२१ रुपयांप्रमाणे दर देण्यावर भर आहे. जास्त ओलावा असल्यास शेतकरी कंपनीकडून ७१५० रुपयांनी खरेदी होत आहे. सध्या ९ ते १२ टक्‍के ओलाव्याचा कापूस बाजारात विक्रीसाठी येत आहे. सध्या ३०० ते ३५० क्‍विंटल कापसाची आवक रोज होत आहे.
- बालाजी ढोबे, संचालक, कांचन फार्मर प्रोड्युसर कंपनी, वरोरा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Inflation Control : वायदेबंदीमुळे महागाई नियंत्रणात बाधा?

Sharada Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

Agriculture Commodity Market : तूर, हरभरा, कापसाच्या किमतीत घसरण

Cow milk Rate : गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात, पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय

SCROLL FOR NEXT