turmeric Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Rate : देशात ४५ लाख पोती हळद शिल्लक

गतवर्षी देशात हळदीचे क्षेत्र २ लाख ४४ हेक्टर इतके होते. देशात हळदीचे सरासरी ८० लाख पोत्यांचे उत्पादन होते. दोन वर्षांपूर्वी गतवर्षी देशात हळदीच्या लागवडीत वाढ झाली होती.

अभिजीत डाके

सांगली ः सोयाबीन (Soybean), मका खपली पिकांच्या, अर्थात साइड मार्केटवर दरात मंदी आली आहे. त्याचा परिणाम हळदीच्या दरावर (Turmeric Rate) झाला आहे. त्यामुळे हळदीच्या दरात प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपयांनी दरात घट झाली आहे. सध्या देशात ४५ लाख पोती (एक पोते ५० किलोचे) शिल्लक (Turmeric Stock) आहेत. हळदीच्या दरात फारशी तेजी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील (Turmeric Industry) जाणकारांनी व्यक्त केला आहे.

गतवर्षी देशात हळदीचे क्षेत्र २ लाख ४४ हेक्टर इतके होते. देशात हळदीचे सरासरी ८० लाख पोत्यांचे उत्पादन होते. दोन वर्षांपूर्वी गतवर्षी देशात हळदीच्या लागवडीत वाढ झाली होती. त्यामुळे देशात हळदीचे उत्पादन ८० लाख पोती होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता.

परंतु हा अंदाज काही प्रमाणात चुकीचा ठरला असल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा हळदच्या क्षेत्रात वाढ झाली. यंदाच्या हळदीच्या हंगामापासून हळदीच्या दरात ५०० ते ८०० रुपयांनी तेजी होती. वास्तविक पाहता, मार्च ते मे हा तीन या तीन महिन्यांत प्रामुख्याने हळद विक्रीचा कालावधी असतो. या दरम्यान, हळदीचे दर चांगले होते. जून महिन्यात देखील हळदीचे दर टिकून होते.

दरम्यान, बाजारात सोयाबीन, मका, खपली यासह अन्य धान्यांच्या दरात मंदी आली. त्याचा परिणाम हळदीच्या दरावर झाला. त्यामुळे जुलै महिन्यापासून हळदीच्या दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री थांबवली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची हळद खरेदी केली आहे. ती हळद देखील विक्री न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

देशात सध्य स्थितीला ४५ लाख पोती शिल्लक आहेत. देशात दररोज चार ते पाच लाख पोती हळदीची विक्री होत असली, तरी बाजारात हळदीचा फारसा उठाव नसल्याचे दिसते आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून, अर्थात दिवाळी झाल्यानंतर हळदीच्या विक्रीत वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत २० ते २५ लाख पोत्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. अर्थात, यंदाच्या हंगामातील सुमारे २० ते २५ लाख पोती हळद शिल्लक राहतील. परंतु या दरम्यान हळदीच्या दरात तेजी-मंदी होण्याची शक्यताही नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशात गेल्या तीन वर्षांपासून हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. परिणामी, उत्पादनही वाढत आहे. या साऱ्याचा परिणाम हळद आवक आणि दरावर होत आहे. त्यामुळे दराचे अंदाज काहीअंशी चुकीचे ठरत आहेत.

देशात यंदाच्या हंगामातील हळदीचे २ लाख ७५ हजार हेक्टर इतके आहे. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी काही भागांत अतिपाऊस झाला, तर काही भागांत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोणत्या भागात हळद पिकाचे नुकसान झाले आहे, कोणत्या भागात पीक चांगले आहे, याचा अंदाज आत्ता लावणे कठीण आहे. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान देशातील देशातील हळदीचे क्षेत्र आणि पिकाची परिस्थिती समोर येईल. त्याचवेळी उत्पादन घटेल की वाढेल याचा अंदाज लावणे शक्य आहे.

बाजारात साइड मार्केटवर मंदीची छाटा आल्याने हळदीला देखील मंदीचा सामना करावा लागत आहे. तसेच देशात हळदीच्या क्षेत्रात वाढ होतेय. परंतु याचा परिणाम दरावर होत आहे. परंतु गतवर्षीपेक्षा यंदा हळदीच्या निर्यातीत वाढ झाली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
मनोहर सारडा हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT