Tomato Market Update : पावसामुळे उत्पादक केंद्रांमधून पुरवठा खंडित झाल्यामुळे दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोच्या किरकोळ विक्री किमती १४० रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत.
आशियातील सर्वांत मोठी फळे आणि भाजीपाला बाजारपेठ असलेल्या येथील आझादपूर मंडईत टोमॅटोचे घाऊक भाव सोमवारी (ता. ३) गुणवत्तेनुसार ६० ते १२० रुपये प्रति किलो या श्रेणीत होते.
मदर डेअरीच्या सफाळमध्ये रविवारी (ता. २) ९९ रुपये किलोने टोमॅटो विकला जात होता. ऑनलाइन किरकोळ विक्रेते (ओटीपी) सोमवारी (ता. ३) टोमॅटो हायब्रीड १४० रुपये प्रति किलो आणि बिगबास्केट १०५-११० रुपये प्रति किलो दर देत होते.
आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की मुख्य उत्पादक केंद्रांकडून पुरवठा होत नसल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले आहेत. पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे.
पावसामुळे शेजारील हरियाना, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून होणारा पुरवठा लवकर संपला. आता, दिल्ली-एनसीआर क्षेत्रासाठी हिमाचल प्रदेश हा एकमेव पुरवठादार आहे. डोंगराळ राज्यातही मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकिंग आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादक केंद्रांमधून व्यापाऱ्यांना पुरवठा होऊ शकत नाही, कारण पावसामुळे तेथील भाव चढे आहेत, असे त्यांनी नमूद केले. कौशिक हे बाजार समिती (एपीएमसी) आझादपूरचे सदस्यदेखील आहेत.
कौशिक म्हणाले, की २५ किलोचा क्रेट २४०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान आहे. उत्पादक केंद्रांवर टोमॅटोचा दर प्रति किलो १००-१२० रुपये आहे. या दराने माल दिल्लीत आणणे व्यापाऱ्यांना परवडत नाही.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये येत्या १५ दिवसांत पावसाची स्थिती सुधारल्यानंतर दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचा पुरवठा सुधारण्याची अपेक्षा आहे, तोपर्यंत भाव स्थिर राहतील, असे ते म्हणाले.
टोमॅटोचे भाव केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर भागांतही वाढले आहेत. टोमॅटोच्या किमतीत वाढ ही ‘हंगामी’ घटना असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या वेळी, साधारणपणे किमती जास्त आहेत आणि पुढील १५ दिवसांत त्या कमी होतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.