Tur, Tomato Rate : तूर, टोमॅटोच्या दरांत तेजी

Kharif Cultivation : या वर्षी उशिरा पाउस सुरू झाल्यामुळे देशातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे. ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाखालील क्षेत्रात १४ टक्के घट झाली आहे.
Tur, Tomato Rate
Tur, Tomato RateAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

Futures prices : फ्यूचर्स किमती - सप्ताह २४ ते ३० जून २०२३

या वर्षी उशिरा पाउस सुरू झाल्यामुळे देशातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे. ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाखालील क्षेत्रात १४ टक्के घट झाली आहे. अशीच घट सोयाबीन (१७ टक्के), तूर (७९ टक्के) व मका (२४ टक्के) या पिकांमध्ये दिसून आली. मुगाखालील क्षेत्रात मात्र २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या सप्ताहात कापूस, मका, मूग, सोयाबीन व तूर यांच्या किमती घसरल्या. कांद्याची व टोमॅटोची आवक अजूनही वाढती आहे; मात्र त्यांच्या किमती अति-पावसामुळे या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वाढल्या. मुगाची आवक वाढत आहे. हळदीमधील तेजीचा फायदा करून घेण्याची आता संधी आहे.

मक्याचे भाव वाढत आहेत. ३ जुलैपासून NCDEX मध्ये मक्यासाठी नोव्हेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू होतील. ३० जून रोजी संपलेल्या सप्ताहात कमोडिटीजच्या किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ५६,७८० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा २ टक्क्यांनी घसरून रु. ५५,६६० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५७,१०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५६,७०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.९ टक्क्याने अधिक आहेत.

कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवक पण आता कमी होत आहे. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४१८ वर आले होते. या सप्ताहात ते १.२ टक्क्याने घसरून रु. १,४०१ वर आले आहेत.

नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

Tur, Tomato Rate
Cotton Sowing : कापूस लागवड पावसाअभावी रखडली

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ७.३ टक्क्यांनी वाढून रु. १,९७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.९ टक्क्याने घसरून रु. १,९३८ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑगस्ट डिलिव्हरी) किमती रु. १,९५६ वर आल्या आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १९८० वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.२ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहेत. मक्याची आवक वाढत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ८,२५९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुनः ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ८,६१० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ५.८ टक्क्यांनी वाढून रु. ९,८५८ वर आल्या आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स किमती प्रथमच रु. १०,००० पेक्षा अधिक (रु. १०,३०६) आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १९.७ टक्क्यांनी जास्त आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. १०,७५४) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अजून अनुकूल संधी आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ४,९०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,१५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. या महिन्यात हरभऱ्याचे भाव रु. ४,८०० ते रु. ५,२०० दरम्यान आहेत.

Tur, Tomato Rate
Turmeric Rate : हळद दरात सुधारणा; नांदेड बाजार समितीत कमाल ९१०० रुपये

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्याने घसरून रु. ७,८०० वर आली होती. या सप्ताहात ती ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,५०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या पाच सप्ताहांत वाढू लागली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ती सर्वाधिक होती. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती घसरत आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,२५२ वर आली होती. या सप्ताहात ती १.९ टक्क्याने घसरून रु. ५,१५१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. ९,४५० वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्याने घसरून रु. ९,३०१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्‍चित आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ई-मेल : arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com