Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : निर्यातीच्या केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल दर

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी निर्यातीला एप्रिल महिन्यापासून सुरुवात झाली आहे. सध्या पाच ते सहा कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करीत आहेत.

या कंपन्यांनी पश्चिम बंगालमधील सुमारे साडेचार हजार मजूर केळी पॅकिंग, काढणीच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध केले आहेत. काही दिवसांपासून केळीदर दबावात आहेत. परंतु मागील दोन-तीन दिवसांत केळी दरात सुधारणा झाली आहे. कंटेनरचा तुटवडा असल्याने केळी निर्यातीला फटका बसला. कारण मागणी करूनही निर्यातदारांना कंटेनर उपलब्ध होत नव्हते. तसेच वाहतुकीसंबंधी देखील अडचणी होत्या, निर्यात रखडत सुरू होती.

यंदा खानदेशातून सुमारे १२०० कंटेनर आखातात निर्यात होण्याची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात झाली असून, सध्या रोज सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. यात दोन कंटेनर रोज शहादा तालुक्यातून एका कंपनीच्या मदतीने आखातात पाठविले जात आहेत. तर जळगाव जिल्ह्यातून रोज तीन ते चार कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे.

सावदा (ता. रावेर) व परिसरातील केळी पॅक हाऊसची मदत केळी निर्यातदार कंपन्यांना केळी पॅकिंग व इतर कार्यवाहीसाठी होत आहे. निर्यातीच्या केळीला कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. रावेरात अधिकची निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे.

सुमारे १२ केळी खरेदीदार कंपन्या खानदेशात केळी खरेदी करीत आहेत. यामुळे केळी दरांवरील दबाव काहीसा झाला आहे. सध्या आंध्र प्रदेशातही केळी उपलब्ध नाही. यामुळे दिल्ली, पंजाब, काश्मीर आदी भागांतूनही खानदेशातील केळीला उठाव आहे. केळीचे किमान दर खानदेशात ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

Non Spinning Crisis : रेशीम कोष उत्पादकांसमोर ‘नॉन स्पीनिंग’चे संकट

Agriculture Department : पदोन्नत्या थांबवा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल

Agriculture Projects : ‘कृषी, पशुसंवर्धना’साठी २३,३०० कोटींचे प्रकल्प

Pomegranate Rate : डाळिंबाचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT