Banana Market : कमी दरात केळी खरेदीबाबत कारवाईचा इशारा

Banana Rate : रावेरातही कोचूर व लगत असे कमी दरात केळी खरेदीचे प्रकार सुरू आहेत.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी केल्याचे प्रकार सुरू होते. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर तातडीने संबंधितांविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन करतात. ज्या केळीची निर्यात परदेशात व इतर भागांत होत आहे, त्या शेतकऱ्यांना दर बऱ्यापैकी मिळत आहेत. परंतु कमी दर्जाची केळी व इतर केळी उत्पादकांना रावेर बाजार समिती जे दर जाहीर करते, त्यापेक्षा कमी दर मिळत आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

Banana Market
Banana Market : केळीचे दर अस्थिर; रोज ५०० ट्रकची आवक

रावेरातही कोचूर व लगत असे कमी दरात केळी खरेदीचे प्रकार सुरू आहेत. तसेच एेनपूर, निंबोल, केऱ्हाळे भागातही शेतकऱ्यांमध्ये तक्रारी आहेत. रावेर बाजार समिती केळीचे दर रोज जाहीर करते. परंतु या दरात केळीची खरेदी होत आहे की नाही याबाबत तपासणी, चौकशी कुठेही केली जात नाही. मध्यंतरी चोपडा, जळगाव बाजार समितीदेखील केळी दर जाहीर करीत होती.

Banana Market
Banana Research Center : शेलगावला केळी संशोधन केंद्रासाठी प्रयत्न

परंतु कमी दरात खरेदीचे प्रकार सुरूच होते. या प्रकाराकडे बाजार समित्या व जिल्हा उपनिबंधक विभाग, संबंधित यंत्रणा सतत दुर्लक्ष करीत आहेत. तसेच अनेक व्यापारी विनापरवाना खरेदी करतात. उधारीने खरेदीचे प्रकार होऊन पुढे शेतकऱ्यांची फसवणूकदेखील होते.

या प्रकाराला ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडताच जिल्हा प्रशासनाने संबंधित बाजार समित्यांना कमी दरातील खरेदीचे प्रकार कुठे झाले, याची माहिती देण्यास सांगितले आहेत. तसेच याबाबत तक्रारी असतील तर त्याचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना केल्या आहेत.

यातच याबाबत चौकशीसाठी पथके नेमून थेट शेतांमध्ये तपासणी, शेतकऱ्यांची केळी काढणीदरम्यान भेट घेण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी उपस्थित करीत आहेत. केळीची खरेदी थेट शिवारात किंवा शेतात केली जाते. यामुळे बाजार समितीत बसून काहीही उपयोग नाही. कुणी शेतकरी कोविडमुळे तक्रार घेऊन येणार नाही.

शेतकऱ्यांसमोर केळी विक्री व इतर अडचणीदेखील असतात. शेतकरी उघडपणे बोलत नाहीत, कारण खरेदीदार एकी करून शेतकऱ्यांची कोंडी करतात. यामुळे बाजार समित्या, सहायक निबंधक कार्यालयासह वजन व मापे विभागाने पथक तयार करून ज्या भागात अधिकची केळी काढणी सुरू आहे, त्या भागात चौकशीसत्र राबविण्याची मागणीदेखील होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com