Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : देशात १२० लाख टन सोयाबीन उत्पादन

देशातील सोयाबीन हंगाम सुरु झालाय. यंदा सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असल्याचं सुरुवातीपासून सांगणाऱ्या सोपानं आपला सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केलाय.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशातील सोयाबीन हंगाम (Soybean Season) सुरु झालाय. यंदा सोयाबीन पिकाची स्थिती (Soybean Crop Condition) चांगली असल्याचं सुरुवातीपासून सांगणाऱ्या सोपानं आपला सोयाबीन उत्पादनाचा (Soybean Production Estimate) अंदाज जाहीर केलाय. सोपाने यंदा देशातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) १२० लाख टनांवर पोचेल, असं म्हटलंय. तर मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकता अधिक असून महाराष्ट्रातील उत्पादकता घटल्याचं सोपानं म्हटलंय.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपा ही देशातील सोयाबीन प्रक्रियादार उद्योगांची संघटना आहे. सोपा दरवर्षी देशातील सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया तसचं सोयापेंड उत्पादन, वापर आणि निर्यात याविषयीचे अहवाल जाहीर करत असते. सोपानं आता चालू हंगामातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केलाय. यंदा सोयाबीनची लागवड कमी होऊनही उत्पादन वाढल्याचं सोपानं म्हटलंय. देशाची यंदा उत्पादकता अधिक आल्याचा दावा सोपानं केलाय.

सोपाच्या मते यंदा देशात ११४ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. हा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास ६ लाख हेक्टरनं कमी आहे. तर उत्पादन मात्र गेल्यावर्षीपेक्षा जास्त होईल. यंदा गेल्यावर्षीपेक्षा देशाची सोयाबीन उत्पादकता जास्त आल्याचं सोपानं म्हटलंय. मागील हंगामातील ९९१ किलो प्रतिहेक्टरवरून उत्पादकता १०५० किलोपर्यंत पोचली. त्यामुळं उत्पादनही ११९ लाख टनांवरून यंदा १२० लाख टनांवर उत्पादन पोचेल, असा अंदाजही सोपानं व्यक्त केलाय.

सोपानं यंदा मध्य प्रदेशातील सोयाबीन लागवड कमी होऊनही उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त येईल, असं म्हटलंय. यंदा मध्य प्रदेशातील सोयाबीन लागवड गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख टनांनी पिढाडीवर पडून ५० लाख ६६ हजार हेक्टरवर पोचली. मात्र उत्पादन एक लाख टनानं वाढून ५३ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज सोपानं व्यक्त केलाय. तसचं यंदा मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकता ११२ किलोनं वाढून १०५१ किलोवर पोचल्याचं सोपानं म्हटलंय.

महाराष्ट्रातील सोयाबीन पेरा गेल्यावर्षीएवढाच असल्याचं सोपाचं म्हणणये. मात्र उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दीड लाख टनानं कमी होऊन ४७ लाख टनांवर स्थिरावेल. तर उत्पादकता प्रतिहेक्टरी २२ किलोने घटून १०८० किलोपर्यंत कमी होईल, असंही सोपानं म्हटलंय.

मात्र बाजारातील जाणकार आणि शेतकऱ्यांच्या मते सोपाचा हा अंदाज दिशाभूल करणरा आहे. मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. पीक पाण्याखाली जातंय. काढणीला आलेलं सोयाबीन पावसानं भीजतंय. त्यामुळं उत्पादनाला फटका बसतोय. हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.

त्यामुळं सोपाच्या अंदाजापेक्षा पिकाचं नुकसान जास्त आहे. सोपा पुढील काळात आपला अंदाज कमी करत जाईल. त्याकाळात दरही सुधारतील. देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज पुढील महिनाभरात येईल. सध्याची बाजाराची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरासरी ५ हजार रुपये दर मिळतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT