Soybean Rate : मका, हरभरा, सोयाबीनमध्ये घसरण

१ ऑक्टोबरपासून NCDEX मध्ये मक्याचे फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी व हळदीचे एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. सध्या NCDEX मध्ये मक्याचे (छिंदवाडा) ऑक्टोबर ते फेब्रुवारीसाठी आणि हळदीचे (निजामाबाद) ऑक्टोबर ते डिसेंबर व एप्रिलसाठी फ्यूचर्स व्यवहार सुरू आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

१ ऑक्टोबरपासून NCDEX मध्ये मक्याचे फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी व हळदीचे (Turmeric) एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. सध्या NCDEX मध्ये मक्याचे (Maize Rate) (छिंदवाडा) ऑक्टोबर ते फेब्रुवारीसाठी आणि हळदीचे (निजामाबाद) ऑक्टोबर ते डिसेंबर व एप्रिलसाठी फ्यूचर्स व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसाचे (Cotton Rate) (राजकोट) ऑक्टोबर ते जानेवारी व कपाशीचे (राजकोट) नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी फ्यूचर्स व्यवहार उपलब्ध आहेत.

Soybean Rate
Maize Rate : मक्यातील तेजी का नरमली?

सोयाबीन मात्र अजूनही फ्यूचर्स बाजाराबाहेर आहे. या पिकाने गेल्या वर्षी खूप चढ-उतार अनुभवले. सोयाबीनच्या किमतीने ऑगस्ट २०२१ मध्ये रु. ८,६०० पेक्षा अधिक उच्चांकी पल्ला घेतला. त्यानंतर त्या सतत घसरून ऑक्टोबर २०२१ मध्ये रु. ४,७२४ वर आल्या. त्यानंतर त्या पुन्हा चढत राहून रु. ७,००० वर एप्रिल २०२२ मध्ये पोहोचल्या. नंतर मात्र त्या घसरत राहिल्या आहेत व सध्या रु. ५,००० च्या आसपास आहेत.

या वर्षी सोयाबीनचे भवितव्य काय असेल?

भारतातील सोयाबीनच्या किमती बऱ्याच अंशी आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात. याचे मुख्य कारण आपण खाद्यतेलाची मोठी आवक करतो व सोयाबीन पेंडीची निर्यातसुद्धा करतो. गेल्या वर्षी प्रथम कोरोनामुळे व नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खूप ढवळून गेली. त्याचा फटका आपल्यालासुद्धा बसला. कोरोना संकटाची तीव्रता जरी कमी झालेली असली तरी युद्ध चालूच आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारेपठेत पुरवठा व किमतीत अनपेक्षित चढ-उतार या वर्षीसुद्धा सहन करावे लागतील.

Soybean Rate
Chana cultivation : हरभरा लागवडीसाठी कोणत्या जाती निवडाल?

अमेरिकेचे कृषी खाते (USDA), FAO व IGC यांनी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिलेल्या अंदाजानुसार २०२२-२३ या वर्षी सोयाबीनचे जागतिक उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल. वर्षअखेर साठा सुद्धा १० टक्क्यांनी वाढेल. थोडक्यात, पुरवठ्यात वाढ होईल आणि त्यांचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होण्याची शक्यता आहे. भारतात मात्र सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी असेल असा अंदाज USDA ने वर्तवला आहे व ही घट ३.४ टक्क्यांनी असेल असे म्हटले आहे. भारत सरकारने सुद्धा गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षीचे उत्पादन कमी असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे; मात्र ही घट ०.८ टक्का असेल असे त्यांचे अनुमान आहे.

या वर्षी भारतातील मॉन्सूनचा पाऊस ६ टक्क्यांहून अधिक झाला. सोयाबीनचे उत्पादन देशात मुख्यत्वे मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये होते (या दोन राज्यांचा देशातील सोयाबीन उत्पादनातील सहभाग जवळजवळ ८५ टक्के आहे.) या दोन्ही राज्यांतील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांत पाउस १० ते ४० टक्के अधिक झाला आहे. त्यामुळे कदाचित सोयाबीनचे उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम म्हणून या वर्षी किमती हमीभावापेक्षा (रु. ४,३००) अधिक राहतील असे वाटते; परंतु त्या एप्रिल २०२२ ची पातळी गाठण्याची शक्यता कमी आहे. (अर्थात, हे अंदाज आहेत; ते अनेक कारणांनी चुकू शकतात. परिस्थितीवर कायम व अभ्यासपूर्ण लक्ष ठेवणे हे त्यामुळे अत्यंत जरुरीचे आहे).

Soybean Rate
Soybean Crop Damage : पावसाचे पुनरागमन सोयाबीनसाठी मारक

या सप्ताहात मका, हरभरा, मूग, व सोयाबीन यांचे भाव घसरले. कापसाचे भाव १.४ टक्क्याने वाढले, तर सोयाबीनमध्ये ०.८ टक्क्यांची घट झाली. मूग ३.२ टक्क्यांनी घसरला, तर तुरीचे भाव ०.९ टक्क्याने वाढले. कांदा व टोमॅटो यांच्या किमती आता वाढू लागल्या आहेत.

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) सप्टेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ८.२ टक्क्यांनी घसरून ३३,४०० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा १.४ टक्क्याने वाढून ३३,८७० वर आले आहेत. नोव्हेंबर डिलिव्हरी भाव १.५ टक्क्याने वाढून रु. २९,८५० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.४ टक्क्याने वाढून रु १,८०१ वर आले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,३६१ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. २,३७९ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स किमती रु. २,४०४ वर आल्या आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ७,१९७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती २.५ टक्क्यांनी वाढून रु. ७,१६६ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,३०६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ४,५६० ते रु. ४,७०० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ४,६०२ वर आल्या आहेत. हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,८७५ वर आली आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. गेल्या दोन सप्ताहांत मुगाची आवक पावसामुळे कमी झाली.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) सप्टेंबर महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,०७१ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ०.८ टक्क्याने घसरून रु. ५,०७८ वर आली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ती ०.९ टक्क्याने वाढून रु. ७,१६६ वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com