Nagpur News : कळमना बाजार समितीत कोथिंबीर (सांभार) आवक गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत तब्बल १०० क्विंटलनी वाढत ४५० क्विंटलवर पोहोचली आहे. आवक वाढल्याच्या परिणामी दरही दबावात आले आहेत.
कळमना बाजार समितीत तब्बल ७० टक्के भाजीपाला हा राज्याच्या इतर भागांतून येतो. तत्कालीन विभागीय सहसंचालकांनी एका अभ्यासाअंती हे निरीक्षण नोंदविले होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह लगतच्या मध्य प्रदेशातून देखील कळमना बाजारात भाजीपाला आवक होते. जुलैच्या सुरुवातीला कोथिंबीर आवक ३५० क्विंटलवर होती.
४००० ते ७००० रुपयांचा दर मिळत होता. मागणी अधिक तुलनेत आवक कमी असल्याचे सांगत वाढीव दराने कोथिंबिरीचे व्यवहार होत होते. कोथिंबिरीला सरासरी दर ६२५० रुपयांचा मिळत होता. त्यानंतर यात मोठी वाढ होत ३ जुलैला कोथिंबिरीला उच्चांकी ५००० ते ९००० रुपयांचा दर मिळाला. त्यानंतरच्या काळात ३००० ते ८००० असाही दर होता. ४ जुलैनंतर दरात सातत्याने चढउतार नोंदविण्यात आले.
२००० ते ५०००, ४००० ते ७०००, ३००० ते ५००० रुपये असे दर मिळाले होते. २२ जुलै रोजी कोथिंबिरीला १५०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीचा दर गुरुवारपासून (ता. २५) सर्वाधिक दबावात आले. या दिवशी आवक ३८० क्विंटल आणि दर किमान १००० ते कमाल ४००० रुपये असा होता. सोमवारी (ता. २९) आवक पुन्हा ३५० क्विंटलपर्यंत झाली तर दर किमान २००० ते कमाल ४००० रुपयांपर्यंत होते.
मंगळवारी (ता. ३०) दर पुन्हा दबावात येत १००० ते १५०० रुपयांवर आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक वाढल्यास दरात मोठे चढउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अमरावतीत अत्यल्प २० क्विंटल आवक
कळमना बाजारात कोथिंबीर आवक ३५० क्विंटलवरून ४५० क्विंटलवर पोहोचली आहे. मात्र त्याचवेळी अमरावती बाजार समितीत कोथिंबिरीची अवघी २० क्विंटल इतकी अत्यल्प आवक नोंदविली गेली. या ठिकाणी कोथिंबिरीला किमान १००० ते कमाल १२०० रुपये असा दर मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.