River Agrowon
ग्रामविकास

River Conservation : चला जाणूया नदीला...

In a State Level Campaign : महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्रालयाने सुरू केलेल्या चला जाणूया नदीला या राज्यस्तरीय अभियानामध्ये राज्यातील शंभरावर नद्या अभ्यासाला घेण्यात आलेल्या आहेत.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

Rivers of Maharashtra : महाराष्ट्रामध्ये सुमारे पाच प्रमुख नदी खोरे असून, सहावा महानदीचे खोऱ्याचा काही भागदेखील महाराष्ट्रामध्ये समाविष्ट आहे. ‘चला जाणूया नदीला’ या अभियानातील ‘नदी प्रहरी’ ने केलेल्या लोकाभ्यासाचे काही प्राथमिक पाहणीची चर्चा येथे करूयात. आपण कृष्णा खोऱ्यापासून अनुक्रमे थोडासा आढावा घेत आहोत.

कृष्णा खोरे

कृष्णा खोऱ्यातील कृष्णा, भीमा, पंचगंगा, कोयना, वारणा इत्यादी प्रमुख नद्यांच्या क्षेत्रामध्ये माती वाहून जाण्याचा दर वाढला आहे. त्याचप्रमाणे मागील दोन दशकांच्या कालावधीमध्ये मूलभूत सुविधांच्या उभारणीमध्ये विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, इतर जिल्हा मार्ग, ही सर्व रस्त्यांचे जाळे महाराष्ट्रामध्ये अगदी खोलवर विस्तारण्यात आलेले आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या योजनांचा उपयोग करून दुर्गम भागातल्या गावांना जोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे ही निश्‍चितच कौतुकाची बाब आहे.

‘चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या माध्यमातून नदी प्रहरींनी आपापल्या छोट्या नद्या ओढे ओहोळ यांची पाहणी केली असता; अनेक ठिकाणी जेथे रस्ते झाले आहेत त्या ठिकाणावरून नद्यांच्या अथवा प्रवाहांना विशेषतः पावसाळ्यात मुक्तपणे वाहणे शक्य होत नाही.

वरील परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस पडण्याची दिवस किमान आठ ते दहा सरासरी असतातच. याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. भूपृष्ठावर पडलेले पाणी वेगाने वाहत जाऊन जवळच्या ओढ्यांमधून आणि नद्यांमधून प्रवाहित होते.

या प्रवाहाच्या मार्गामध्ये जर रस्ते असतील, पूल असतील तर त्या ठिकाणी वेगात आलेले पाणी अडते आणि त्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार होतो. अशा क्षेत्रांमध्ये जर मानवी वस्ती असेल तर त्या मानवी वस्तीमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन हाहाकार मारतो. आपण हे कोल्हापूर, गडहिंग्लज, हलोंडी, सांगली इत्यादी ठिकाणी वारंवार अनुभवतो आहोत.

भीमा खोरे

भीमा नदीच्या उगमापासून म्हणजे भीमाशंकराच्या ठिकाणापासून सोलापूरपर्यंत भीमा नदी महाराष्ट्रातून वाहते. तिला मुळा, मुठा, नीरा, सीना, घोड, मीना, पुष्पावती, इत्यादी अनेक नद्या तिला येऊन मिळतात. याही नद्यांच्या क्षेत्रामध्ये अशाच प्रकारची स्थिती आढळते आहे.

गाळ वाहून येणे आणि पाणी साचणे यामुळे मानवी वस्तीमध्ये पाणी शिरते; अन्यथा शेत जमिनीमध्ये बराच काळ पाणी साचून राहते. त्यामुळे जनजीवन अस्तव्यस्त होते आणि शेती उत्पादक राहत नाही.

कोकणातील नद्या

कोकणामध्ये सुमारे २३ नद्यांची उपखोरी अस्तित्वात आहेत. मोखाडा जिल्हा पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत याचे जाळे विस्तारले आहे. अति तीव्र उतार आणि नद्यांची कमी लांबी ही येथील भूरचना आहे. पश्‍चिम घाटाचा अरबी समुद्राला मिळणारा प्रवाह येथून सुरू होतो.

२००५ मध्ये झालेल्या पुराची तीव्रता तर अत्यंत दाहक अशी होती. सुमारे हजार लोक मृत्युमुखी पडले कोट्यवधी रुपयाचे वित्तहानी झाली हे सर्व सर्वश्रुत आहे.

चिपळूण, महाड, रत्नागिरी या ठिकाणची पुराने झालेली हानी आपण प्रत्यक्षात बघितलेली आहे. याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येतो. या ठिकाणी गाळाचे स्वरूप हे घाटावरील गाळापेक्षा भिन्न असते. या ठिकाणी गाळ म्हणजे काळी माती नसून लहान मोठे गोटे अशी व्याख्या आहे.

या ठिकाणी काही नद्यांचे उदाहरण मी देऊ इच्छितो कोकणामधील वाशिष्टी, सावित्री, गांधारी, काळ, काजळी नदी या नद्यांच्या क्षेत्रामध्ये गाळाचे प्रमाण अधिक असून ते नदीपात्रात थांबते. त्याच्यानंतरच्या लगत वर्षात येणाऱ्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी गाळ साचून राहिलेला आहे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते.

ज्या ठिकाणी शहरांची दाटी वाढलेली आहे अशा ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यास ते पाणी त्या शहरांमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याचे उदाहरणही आपण बघितलेले आहे.

गोदावरी खोरे

कमी अधिक प्रमाणामध्ये गोदावरी खोऱ्यात देखील हीच स्थिती आपल्याला आढळते. गडचिरोली जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदीची मागील एका दशकापासून पुराची तीव्रता वाढते आहे. चर्चा केल्यानंतर वैनगंगा नदीचे नदीपात्र देखील उथळ झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे आणि तज्ज्ञांचेही तसे अहवाल आहेत.

मन्याड नदी

मन्याड नदी ही गोदावरी नदीची उपनदी मांजरा नदीची उपनदी होय. बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगरातून या नदीचा उगम होऊन ती महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर देगलूर तालुक्यामध्ये मांजरा नदीला येऊन मिळते. या नदीच्या शेवटच्या टप्प्यातील सुमारे १३ किलोमीटरच्या पात्रांमध्ये अनेक ठिकाणी सरासरी दहा ते बारा मीटर गाळ इतका नदीपात्रामध्ये साचला आहे.

प्रत्यक्ष पाहणीद्वारे या बाबीची खातरजमा देखील करण्यात आलेला आहे. एकट्या मनाड नदीच्या नांदेड जिल्ह्यातील प्रवाहाच्या क्षेत्रात सुमारे २८ गावे पूरप्रवण गावे म्हणून ओळखली जातात. काही गावांचे पुनर्वसन झालेले असून, काही गावांचे मागील एका शतकामध्ये दोन वेळेस पूर्ण पुनर्वसन झाल्याचे देखील लक्षात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT