Sangali News: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वारणा धरणातून मंगळवारी (ता. १९) २९९८५ क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्यातच कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे..जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस, आटपाडी, खानापूर, विटा, तासगाव, जत या तालुक्यात मध्यम पाऊस सुरु आहे. तर शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासात धरण परिसरात ९२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. धरण पाणलोट परिसरात अतिवृष्टी सुरू झाली असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे..Shirala Rain: मोरणा धरण, शिवणी, टाकवे तलाव भरले.त्यामुळे धरण व्यवस्थापन धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सोमवारी दोन वेळा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १९) वक्रद्वारातून २८,३५५ क्युसेक तर विद्युत गृहातून १६३० असा एकूण २९,९८५ क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिराळा तालुक्यातील आरळा, चरण पुल पाण्याखाली गेला आहे..दरम्यान, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी १८.९ फूट इतकी झाली आहे. नागठाणे बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला..Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन.‘आलमट्टी’तून सव्वा लाख क्सुसेक विसर्गधरण क्षेत्रात वाढलेला पाऊस आणि धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज)आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. धरणात १ लाख ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे..धरणातून मंगळवारी (ता. १९) १ लाख ७५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवला आहे. आलमट्टी भरण्याच्या मार्गाने जात असताना आवक वाढल्याने विसर्ग वाढविला आहे. मंगळवारी (ता. १९) धरणात ११३.७६ टीएमसी साठा झाला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.