चारसूत्री पद्धतीने भात लागवड  Agrowon
कृषी पूरक

चारसूत्री पद्धतीने भात लागवड पद्धत

चार सूत्री पद्धतीने भात लागवड करताना चार सूत्रांचा वापर करून भाताची लागवड केली जाते.

Team Agrowon

भात लागवडीसाठी (rice transplanting) जमिनीचा सामू हा चार ते सहाच्या दरम्यान असावा लागतो. योग्य वाढीसाठी शेतीची योग्यप्रकारे पूर्वमशागत गरजेची असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या थरांची उलटा-पालट होऊन, काही अंशी तण, कीड आणि रोगांचेही नियंत्रण होण्यास मदत होते. लावणी पद्धतीमध्ये भाताची रोपे रोपवाटिकेत तयार करून जमिनीची चिखलणी करून लागवड करावी.

चार सूत्री पद्धतीने भात लागवड करताना चार सूत्रांचा वापर करून भाताची लागवड केली जाते.

सूत्र १- भातपिकांच्या अवशेषांचा फेरवापर- भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत मिसळली जाते. राखेत सिलिकॉनचे प्रमाण मुबलक असल्याने, रोपांच्या वाढीसाठी सिलिकॉनचा पुरवठा मुबलक चांगला होतो. राख अर्धा ते एक किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात रोपवाटिकेमध्ये मिसळावी. रोपे निरोगी राहण्यास मदत होते.

भाताचा पेंढा- नांगराच्या मदतीने जमिनीत गाडून घ्यावा. यामुळे रोपांना सिलिकॉनसह पालाशचीही उपलब्धता होते. भाताच्या पेंढ्याचे प्रमाण दोन टन प्रति हेक्टरी पहिल्या नांगरणीवेळी असावे. रोपांची कीड व रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढीस लागते.

सूत्र-२- भातपिकासाठी हिरवळीच्या खताचा वापर करावा. हिरवळीच्या खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून, जमिनीची उत्पादकता वाढीस लागते.

सूत्र-३ – सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताच्या बियाणांची पेरणी करावी आणि रोपांची नियंत्रित लागवड. लावणी करतानाचे अंतर १५-२५ × १५-२५ सेंटीमीटर इतके असावे. आलटून पालटून १५-२५-१५-२५ सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी.

सूत्र-४- नियंत्रित लागवडीनंतर प्रत्येक चौकोनात त्याच दिवशी २.७ ग्रॅम वजनाची युरिया ब्रिकेट हाताने ५ ते ७ सेंटीमीटर खोल खोचावी. असे केल्याने खताची मात्रा कमी लागून, खतांचा पुरेपूर वापर करून घेता येतो.

चार सूत्री पद्धतीमध्ये जवळपास ३० टक्के बियाण्यांची बचत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT