Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : गुरांच्या वाहतुकीस राज्यात सशर्त परवानगी

टीम ॲग्रोवन

नागपूर ः राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) वाढता असल्याने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत जनावरांची वाहतूक (Animal Transport) त्यासोबतच जनावरांच्या बाजारावरही बंदी घालण्यात आली होती. शासनाने आता अधिसूचनेनुसार जनावरांच्या जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सशर्त मान्यता दिली असून, म्हशीचे बाजारही (Buffalo Market) भरविता येणार आहेत.

राज्यात सप्टेंबर महिन्यापासून लम्पी स्कीन आजाराची तीव्रता वाढली. त्यानंतरच्या काळात गोट पॉक्‍स लसीकरणाच्या माध्यमातून या रोगांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न झाले. परंतु लम्पी स्कीनवर ही लस प्रभावी नसल्याने त्यातून ६५ ते ७० टक्‍के इतकीच परिणामकारकता साधता आली. त्यातच या वेळच्या लम्पी म्युंटटमध्ये बदल झाल्याने त्याचे नियंत्रण लसीकरणानंतरही प्रभावीपणे होऊ शकले नाही. या साऱ्या कारणांमुळे राज्यात बाधित जनावरांसोबतच दगावण्याचे प्रमाणही वाढले.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य हे नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. ८ सप्टेंबर २०२२ पासून राज्यातील जनावरांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी लादण्यात आली. सोबतच जनावरांच्या बाजारावरही प्रतिबंध लादण्यात आला. आता जनावरांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या बंदीमध्ये काहीशी शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सोमवारी (ता. २१) अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यात आता जिल्ह्यांतर्गत गुरांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याकरिता काही अटी आणि शर्तीचे पालन करावे लागणार आहे. गुरांच्या वाहतुकीसोबतच म्हशींच्या बाजारांनाही राज्यात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाहतुकीकरिता या आहेत अटी...

- २८ दिवसांपूर्वी संबंधित जनावराचे प्रतिबंधक लसीकरण झाले असावे.

- पशुधन विकास अधिकारी, गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करीत त्यांच्याकडून प्राप्त जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र सोबत बाळगावे.

- जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी बंधनकारक.

- प्रपत्रामधील आरोग्य दाखला तसेच जनावरांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT