
सोलापूर : जिल्ह्यात माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा तालुक्यांत लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) जास्त प्रमाणावर जनावरे दगावली (Animal Death Due To Lumpy Skin) आहेत. या ठिकाणी जनावरे दगावण्याच्या कारणांचा शोध घ्या, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी येथे दिल्या.
लम्पी स्कीन प्रादुर्भावा संदर्भात सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, उपस्थित होते.
जनावरे दगावण्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाची संख्या कमी झाली आहे, याबाबत चिंता व्यक्त करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी अन्य तालुक्यांसह माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा तालुक्यांत अधिक कडक उपाययोजना हाती घेण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.
४३२ पशुपालकांना मदत
जिल्ह्यात गाय वर्गातील जनावरांची संख्या सात लाख ४५ हजार ३२४ असून, १७९ इपिसेंटर उभारण्यात आले आहेत. १४ हजार ४५२ एकूण बाधित जनावरे असून, ५ हजार ९४८ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. ९०० मृत जनावरांपैकी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ३१५, करमाळा तालुक्यात २२९, सांगोला तालुक्यात १०५ आणि माढा तालुक्यात १०१ जनावरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली. पैकी एकूण ४३२ मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.