Breeding Bull Agrowon
काळजी पशुधनाची

Breeding Bull : पैदाशीच्या वळूचा आहार कसा असावा?

गोठ्यातील गाई-म्हशींचे गाभण राहण्याचं प्रमाण हे जो वळू कृत्रिम रेतनासाठी वापरला जातो त्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं. चांगल्या प्रजोत्पादनासाठी वळूंना संतुलित, सकस आहार पुरवावा.

Team Agrowon

गोठ्यातील गाई-म्हशींचे गाभण राहण्याचं प्रमाण हे जो वळू कृत्रिम रेतनासाठी वापरला जातो त्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं. चांगल्या प्रजोत्पादनासाठी वळूंना संतुलित, सकस आहार (Healthy Diet) पुरवावा.

दुर्लक्षित आहार व्यवस्थापनामुळे आरोग्य, प्रजनन आणि उत्पादनावर ताण येतो. पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विर्याची प्रत (Semen Quality) कमी होते. त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाणही कमी होतं.

पैदाशीच्या वळूचं (Breeding Bull) आहार व्यवस्थापन (Diet Management) कस असाव याविषयी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया. 

पैदाशीच्या वळूचे आहार व्यवस्थापन 

पैदाशीच्या वळूला पचनीय प्रथिने १२ ते १५ टक्के आणि ७० टक्के एकूण पचनीय घटक असलेले पशुखाद्य २-३ किलो याप्रमाणे दर दिवशी द्यावे.

नवीन वळूला भरपूर प्रमाणात हिरवा चारा द्यावा. कारण त्यांना ‘अ’ जीवनसत्त्वाची गरज असते. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वीर्य निकृष्ट दर्जाचे तयार होते.

वळूचा नैसर्गिक रेतनासाठी जास्त वापर असल्यास आहारात पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे.

नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आहारामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर या खनिजांचा आणि ‘अ’ व ‘इ’ या जीवनसत्त्वांचा समावेश करावा. या घटकांच्या कमतरतेमुळे वळूची प्रजोत्पादन क्षमता घटू शकते.

आहारात कॅल्शिअमचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पाठीच्या मणक्याचे हाड आणि इतर हाडे जोडली जातात, त्यामुळे वळूमध्ये नैसर्गिक रेतनावेळी समस्या निर्माण होतात. नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आहारात सर्व पोषणतत्त्वांच्या योग्य प्रमाणाबरोबरच पिण्यासाठी योग्यवेळी मुबलक पाणी देणं गरजेचं आहे.

वळूला गरजेपेक्षा जास्त किंवा कमी चारा देणं टाळावं. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळला चारा आणि पशुखाद्य द्यावं. मुरघासाचाही वापर करावा.

गरजेपेक्षा जास्त आहार दिल्याने शरीरामध्ये फॅट जमा होऊन वळूंचे वजन वाढते. त्यामुळे पायावर ताण वाढतो. नैसर्गिक रेतनाची इच्छा कमी होते.

गरजेपेक्षा कमी आहार दिल्यास पोषणतत्त्वांची कमतरता होऊन प्रजोत्पादनक्षमता कमी होते.

आहार देताना वळूचे वजन व त्याचा  नैसर्गिक रेतनासाठी वापर या गोष्टींचा विचार करावा.

आहारामध्ये शुष्क पदार्थांचे प्रमाण वजनाच्या २ टक्के इतके असावे. त्यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT