शेळी व्यायल्यानंतर पहिल्या २४ तासाच्या आत येणाऱ्या घट्ट व पिवळसर दुधास चिक असं म्हणतात. काही दिवसांनी हा चिक निवळून दूध स्त्रवू लागते. या चिकात रोगप्रतिकारशक्ती असल्यानं चिक काढून फेकून न देता किंवा तो इतर कशासाठी न वापरता करडांना पाजल्यास सुरुवातीच्या काळात त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होते. करडाचा जन्म झाल्यानंतर पहिला आठवडा करडू शेळीजवळच ठेवावे. नंतर त्याला शेळीपासून वेगळे करावे. तिसऱ्या आठवड्यापासून त्यांना १८ % प्रथिनांचे प्रमाण असलेली गोळी पेंड द्यावी. हे खाद्य तिसऱ्या आठवड्यात ५० ग्रॅम, चौथ्या आठवड्यात १०० ग्रॅम आणि पाचव्या आठवड्यात १५० ग्रॅम असं वाढवित न्यावे. त्याचबरोबर वाळलेला चारा आणि सोबतच क्षारयुक्त चाटण मिश्रणही द्यावं.
करडांना जन्मल्याबरोबर आईचे चिक वजनाच्या १० टक्के, अर्ध्या तासाच्या आत पाजावा म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढते. करडाला दूध सामान्यपणे तीन महिने वयाचा होईपर्यंत पाजत राहावे. करडांचे शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी त्यांना सकस आहार आणि भरपूर व्यायाम महत्वाचा आहे. करडांसाठीचे कप्पे मोकळे, हवेशीर, उबदार आणि कोरडे असावेत. पशु तज्ज्ञांच्याकडून करडांची नियमित तपासणी करुन घ्यावी.
करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण तीन टप्पे असतात. जन्मापासूनचे दोन महिने वय, दोन ते चार महिने वय आणि चार ते सहा महिने वय अशा गटांत करडांची विभागणी केल्यास व्यवस्थापन करणे सोयीचे ठरते. करडांच्या जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. वजनाने कमी असलेली अशक्त करडांकडे जास्तीचे लक्ष द्यावं लागते. बाह्य वातावरण अतिउष्ण असो किंवा अति थंड असो, करडांच्या कप्प्यात गरजेनुसार बदल करावा लागतो. करडांच्या कप्प्याचे तापमान हे 35 ते 38 अंश सेल्सिअस इतकं असाव. करडांच्या कप्प्याचे तापमान संतुलित असल्यास शरीरातील उर्जा तापमानाशी जुळवून घेण्यासाठी खर्ची पडत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.