Fodder Defict Diseases Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Diseases : चारा न मिळाल्यामुळे जनावरांना कोणते आजार होतात?

चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यातच वैरण म्हणून वापरला जाणाऱ्या ज्वारीच्या कडब्याचे दर शेकडा ३५०० ते ५००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अशा परिस्थितीत पशुपालक जनावरांना मिळेल तो चारा खाऊ घालतात. त्यामुळे जनावरांमध्ये क्षार व जीवनसत्त्वाचा अभाव दिसून येतो, तर बऱ्याच वेळा जनावरांचा कुपोषणाने मृत्यू होतो.

Team Agrowon

चारा टंचाईच्या (Fodder Shortage) काळात अनेक पशुपालक जनावरांना ओला चारा म्हणून उसाचे वाढे खाऊ घालतात. पण आता हंगाम संपत आल्याने उसाचे वाढेही मिळणे बंद झाले आहे. तर वाढ्याला पर्याय असणारे मका, हत्तीगवत, नेपिअर या गवताची लागवड देखील कमी प्रमाणात आहे.

त्यामुळे या चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यातच वैरण म्हणून वापरला जाणाऱ्या ज्वारीच्या कडब्याचे दर शेकडा ३५०० ते ५००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अशा परिस्थितीत पशुपालक जनावरांना मिळेल तो चारा खाऊ घालतात.  त्यामुळे जनावरांमध्ये क्षार व जीवनसत्त्वाचा अभाव दिसून येतो, तर बऱ्याच वेळा जनावरांचा कुपोषणाने मृत्यू होतो.

याकरिता पशुपालकाने चाऱ्याची सोय असेल त्या प्रमाणातच उत्पादक जनावरांचे संगोपन करणे गरजेचे आहे. जनावरांमध्ये गरजेनुसार पिण्यासाठी पुरेसे पाणी व चारा मिळत नसल्यास आरोग्याच्या विविध समस्या उद्‌भवतात.

तीव्र पाणीटंचाईचा सर्वांत जास्त दुष्परिणाम नवजात वासरे, गाभण जनावरे व दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः जाणवतो. चारा व पाण्याआभावी जनावरांमध्ये कोणकोणत्या समस्या दिसून येतात याविषयी डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.

१) कुपोषण

जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे कुपोषण होते, तर बऱ्याच वेळा चरायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते.
खोल गेलेले डोळे व ऱ्हाट त्वचा, आखडलेल्या मांसपेशी ही कुपोषण व उपासमारीची लक्षणे आहेत.
कुपोषण व उपासमार टाळण्यासाठी जातिवंत, उत्पादनक जनावरांचे चाऱ्याच्या उपलब्धेनुसार संगोपन करावे.

२) चयापचयाचे आजार

चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे उद्‌भवतात. चरायला बाहेर फिरणाऱ्या जनावरांना तर जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. परंतु, टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण ऊर्जा खर्ची पडते.

यामुळे जनावरांचे वजन दिवसेंदिवस घटत जाते. ही स्थिती मुख्यतः गाभण जनावरांमध्ये लवकर आढळून येते. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या जनावरांना निकृष्ठ चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात पशुखाद्य व क्षार मिश्रण द्यावे.

३) वनस्पतीपासून व खुरट्या चारा पिकापासून विषबाधा

अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची भूक पुर्णपणे भागत नाही. त्यांचे पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी झुडपं चारा समजून खातात.

त्यामध्ये असणाऱ्या नायट्राईट, सायनाईड किंवा इतर घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊन जनावरं दगावतात.

विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत, जेणेकरून जनावरं दगावणार नाहीत.

४) आम्लधर्मीय अपचन

खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्‌भवते.

चाऱ्याची उपलब्धता कमी असल्यास किंवा निकृष्ट चारा असल्यास बरेच पशुपालक आपल्याकडील जनावरांना घरातील धान्य भरडून देतात, तसेच चंदी, खुराकातील घटकांचे, धान्याचे प्रमाण अचानक बदलतात, त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या निर्माण होते.

यामध्ये पोट गच्च राहणे, हगवण लागणे, रवंथ न करणे, लाथा मारते, चारा न खाणे अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपाच्या आम्लधर्मीय अपचनात जनावरं दगावण्याची शक्‍यता असते. या आजारावर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

५) शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरची कमतरता

जनावरांचे संगोपन मुख्यतः वाळला चारा, कडबा, शेतातील दुय्यम पदार्थांवर केले जात असेल तर जनावरांना शरीरपोषणासाठी कॅल्शियम, फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही. जनावरांची हाडे ठिसून होऊन कमकुवत होतात व जनावरांमध्ये उरमोडीसारखे आजार उद्‌भवतात.

फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खाल्लेल्या चाऱ्याचे व्यवस्थित पचन न होणे, अखाद्य वस्तू खाणे या समस्या उद्‌भवतात. जनावरांना व्यवस्थित चालता-फिरता येत नाही. गाभण जनावरांना तोंडावाटे कॅल्शियम व फॉस्फरस दिल्यावरही चांगला परिणाम दिसून येतो.

जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा वापर जनावरांच्या शारीरिक स्थितीनुसार करणे फायदेशीर ठरते.

६) शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता

मॅग्नेशियमची कमतरता मुख्यतः थोडा हिरवा चारा व जास्त वाळला चारा उपलब्ध असण्याच्या कालावधीत होते. पाण्याच्या कमतरतेच्या काळात ज्या पिकाची मुळे खोलवर विस्तारलेली असतात, ती जमिनीतून पाणी शोषून घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात.

या पिकांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या पोटात मॅग्नेशियमचे व्यवस्थित शोषण होत नाही.

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे फेफरे येणे, चक्कर येणे या समस्या उद्‌भवतात. वेळेवर उपचार न झाल्यास पॅरालिसीस होऊन जनावरांचा मृत्यू होतो. या समस्येमध्ये कॅल्शियम-मॅग्नेशियमयुक्त  औषधे पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT