Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांतील खरुज, आसडी वर सोपे उपाय काय आहेत?

Kharuj : जनावरांना प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणुजन्य आणि परोपजीवी असे सांसर्गिक आजार होतात. यापैकी परोपजीवी हे मोठ्या प्रमाणात जनावरांना प्रादुर्भाव करतात. जास्त प्रमाणात दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये परजीवींमुळे होणारे आजार सर्रास आढळतात.

Team Agrowon

Animal Diseases : जनावरांना प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणुजन्य आणि परोपजीवी असे सांसर्गिक आजार होतात. यापैकी परोपजीवी हे मोठ्या प्रमाणात जनावरांना प्रादुर्भाव करतात. जास्त प्रमाणात दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये परजीवींमुळे होणारे आजार सर्रास आढळतात.

हे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. बाह्य परोपजीवीमध्ये सर्व प्रकारच्या कीटकवर्गीय गोचीड, माश्‍या, गोमाश्‍या, पिसवा तसेच खरूज हे कीटक आढळतात.

जनावराच्या शरीराची व गोठ्याची अस्वच्छता, दमट वातावरण, कुपोषण तसेच गोचीड, उवा व पिसवा यासारख्या परजीवींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावराला खरूज होते. खरुज झाल्यास जनावराच्या कातडीवर बारीक लाल रंगाचे पुरळ येतात.

त्याठिकाणचे केस गळून कातडीची जाडी वाढते. कातडीला सुरकुत्या पडतात. जनावर सतत शरीर खाजवत राहतं. खरुज झालेल्या जनावराला जंतुसंसर्ग होतो. यावर उपाय म्हणून खरूज झालेला जनावराला उन्हात व हवेशीर ठिकाणी बांधावे.

जनावराच्या अंगावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीडनाशकाची फवारणी दर आठवड्याला एकदा असे सतत तीन ते चार वेळेस करावी. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने इंजेक्शन आणि औषधांचा वापर करावा. 

बऱ्याचदा  जनावराला झालेल्या जखमेमध्ये आळ्या होतात यालाच आसडी असं म्हणतात. अशा जखमेतून रक्त गळत. जखमेभोवतालचा भाग सुजतो. अशा जखमेवर माशा बसतात. या जखमेमध्ये हिरवी माशी जेंव्हा पांढरी अंडी घालते.

तेंव्हा या अंड्यातून नवजात पिले आळ्यांच्या स्वरूपात बाहेर पडतात. ही पिल्ले जखमेतील पेशी व रक्त यावर जगतात. त्यासाठी जखमेमध्ये घर करून जखमा वाढवितात.

आसडीवर प्रथमोपचार म्हणून एक ते दोन कापूरवाडी व खोबरे तेल एकत्र मिसळून भिजलेला कापसाचा बोळा जखमेमध्ये बसवावा.टरपेंटाईंन तेलामध्ये भिजलेल्या कापसाचा बोळा सतत दोन ते तीन दिवस जखमेमध्ये बसविल्यास सर्व आळ्या मरतात.  

जखमेमध्ये परत आसडी तयार होऊ नये म्हणून जखम त्वरित भरुन येण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मलमाचा वापर करावा.  जखम मोठी असल्यास पशुवैद्यकाच्या साह्याने इंजेक्शन द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT