Latur News: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे असलेल्या ‘अपघात व अतिदक्षता विभाग’ आणि बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) दोन्ही इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारती लवकरच जमीनदोस्त होणार आहेत. या जागेवर ४०० खाटांचे अद्ययावत असे चार मजली रुग्णालय आणि बाह्यरूग्ण विभागाची पाच मजली सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. यासाठी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे शासकीय आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे..विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच औषधशास्त्र, बालरोग, छाती व त्वचा या विभागांकरिता चार मजली नवे रुग्णालय उभे राहणार आहे. यास वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. ही इमारत चार मजली असून ती सध्या अपघात व अतिदक्षता विभाग कार्यरत असलेल्या ठिकाणी उभी राहणार आहे. यासाठी ९३.७७ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदाही मंजूर झाल्या असून संबंधित ठेकेदाराला कार्यारंभाचे आदेश देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाने दिल्या आहेत..Trauma Center Barshi : बार्शीचे ट्रामा सेंटर; गोरगरिबांचे भारी रुग्णालय.जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे अस्तित्वात असलेली बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) इमारत अत्यंत जुनी झाली असून इमारतीमध्ये पाणी गळती, भिंतीमध्ये विद्युत प्रवाह उतरणे, छताचे प्लास्टर गळून पडणे अशा घटना घडत होत्या. .8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या बाह्यरूग्ण विभाग इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. या अहवालातून बाह्यरुग्ण विभागाची इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या इमारतीचा वापर कमी करण्यात आला होता..तातडीच्या उपचारासाठी ६० खाटाया पार्श्वभूमीवर, संस्थेत नवीन बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) नवीन इमारत बांधण्यासाठी ७३ कोटी २९ लाख रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.