कर्जमाफीचं आश्वासन देऊनही कर्जमाफी दिली नाही, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोलमदतीचे आकडे जाहीर करून त्याला आस दाखवली, पण मदत मिळालीच नाहीशेतकरी बांधवांच्या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार.Maharashtra politics: कर्जमाफी (farm loan waiver) आणि शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरुन काँग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही कर्जमाफी दिली नाही. शेतमालाला भाव दिला नाही, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. .''दूष्काळ, ओला दूष्काळ, अतिवृष्टी, पिकावर आलेला रोग या सर्व नैसर्गिक चक्रव्यूहात तुम्ही शेतकऱ्याला राज्यकर्ते म्हणून वाऱ्यावर सोडलं. तो चक्रव्यूहातनं बाहेर पडायचा रस्ता शोधत असताना तुम्ही मदतीचे आकडे जाहीर करून त्याला आस दाखवली, पण ती मदत त्याला मिळालीच नाही. ज्यांना मिळाली त्याने फक्त त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं,'' अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे..Maharashtra Politics: पुढच्यास ठेच मागचा शहाणा.या पोस्टमध्ये त्यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी निदर्शनास आणून दिली आहे. गेल्या दहा महिन्यांत मराठवाड्यातील ८९९ शेतकऱ्यांनी जीवन संपवले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. .Kolhapur Politics: कोल्हापुरात राष्ट्रवादी- शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष टोकाला, 'मी बोललो तर बात दूर दूर तक जाईल', मुश्रीफांचा मंडलिकांना इशारा.सरकारकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांना जाहीर केलेले ३२ हजार कोटींचे पॅकेज हे फसवे असल्याची टीका त्यांनी याआधी केली होती. पीक विम्याचा मुद्याही त्यांनी याआधी उपस्थित केला होता. पीकविमा योजनेच्या नावाखाली लाखो कोटी रुपयांचा फायदा विमा कंपन्यांना देणारे हेच सरकार, शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ पाच रुपये टाकून नुकसानभरपाई दिल्याचे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या शेतकरीविरोधी फडणवीस सरकारला जनता लवकरच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा त्यांनी दिला होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.