Animal Care : जनावरांतील विषबाधेची कारणे कोणती आहेत?

जनावरे चरत असताना त्यांच्या खाण्यात विषारी तणे आणि आजूबाजूच्या अखाद्य वनस्पती खातात त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते.
Animal Poisoning
Animal PoisoningAgrowon
Published on
Updated on

जनावरांसाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध असतो. जनावरे चरत असताना त्यांच्या खाण्यात विषारी तणे आणि आजूबाजूच्या अखाद्य वनस्पती खातात त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. चराई क्षेत्रात सापांचा (Snake) वावर असतो. अशा वेळी जनावरांना सर्पदंशाची (Snake Bite) शक्यता जास्त असते. यासह जनावरांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या विषबाधेची (Animal Poisoning) प्रमुख लक्षणे काय आहेत तसेच विषबाधा झाल्यानंतर काय उपचार करायचे याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आज आपण पाहणार आहोत.

Animal Poisoning
Animal Care: जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा

१) ज्वारीची कोवळी धाटे खाण्यामुळे होणारी विषबाधा
जनावराच्या धडाची मागची बाजू निकामी होते. फेपरे येतात. जनावराला श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो. पोट फुगते. जनावर अस्वस्थ होते. डोळ्यातील बुबळे प्रसरण पावतात. रक्त गडद तांबडे किंवा लाल भडक दिसते.
ही विषबाधा टाळण्यासाठी जनावर ज्वारीची कोवळी धाटे किंवा कोंब खाणार नाही याची काळजी घ्यावी.

२) कीटकनाशक फवारलेली पिके व विषारी औषधे पोटात गेल्यामुळे होणारी विषबाधा
जनावराची मज्जा संस्था उत्तेजित होते. स्नायूंचा थरकाप होतो. जनावर वाकते. दात एकमेकांवर घासते. जनावराला श्वास घ्यायला त्रास होतो. जोरात हालचाल करते. अडखळते. जनावराला ताप येतो.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावराच्या खाद्यात कीटकनाशक फवारलेला चारा येणार नाही याची काळजी घ्यावी.

Animal Poisoning
कोंबड्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य दिले जाते? | Poultry feed | ॲग्रोवन

३) गाजर गवत खाण्यात आल्यामुळे होणारी विषबाधा
जनावराच्या अंगावर गांधी उठतात. कातडी लाल होते. अंगाला सूज येते. अंगावर गाठी येतात. जनावर अस्वस्थ होते. शरीराला खाज येते. दुधाला कडवट चव व वास येतो. यासाठी जनावरांच्या खाद्यामध्ये गाजर गवत येणार नाही याची काळजी घ्यावी.


४) सर्पदंश
जनावरांना सर्पदंश झाल्यास पशुपालकांच्या लवकर लक्षात येत नाही. कुराणात चरत असताना जनावरांना सर्पदंश होतो, जनावराच्या शरीराच्या खालच्या भागावर साप चावल्याची खूण बघावी. साप चावल्याच्या ठिकाणी असह्य वेदना होतात. सूज येते. कधी कधी रक्तही येते. साप चावलेला भाग लाल होतो. जनावर उत्तेजित होते. लाळ गाळते. स्नायू ताठ होतात. शरीराला बाक येतो. जनावर पडते व पक्षाघात किंवा अर्धांगवायू होतो. जनावराला श्वासोच्छवास करण्यासाठी त्रास होतो आणि जनावर दगावते.
जनावरांतील सर्पदंश टाळण्यासाठी जनावराच्या गोठ्यामध्ये अडगळ नसावी. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. गोठ्याच्या जवळपास उंदराची बिळे नसावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com