Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : वाशीम जिल्ह्यात लसीकरणाला वेग

जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू, ३५२ जनावरांना प्रादुर्भाव

टीम ॲग्रोवन

वाशीम : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) रोगाने पाय पसरले असून त्यावर उपाययोजना म्हणून लसीकरणाला (Vaccination) वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ३५२ जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, १३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. लसीकरणानंतर १६० जनावरे बरी झाली असून, सध्याही १७९ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत.

वाशीम जिल्ह्याइतके लाख ६८ हजार पशुधन असून, आतापर्यंत एक लाख ६५ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत आतापर्यंत ४५ गावांतील ३५२ गुरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यातील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळून आलेल्या

या गावांच्या पाच किलोमीटर परिघातील २०३ गावातील गुरांचे लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्यात आले. जिल्ह्यात लम्पी स्कीनचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी तातडीचे निर्देश दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांचे लसीकरण करण्यात आले.

त्यामुळे या आजाराचा जिल्ह्यात संसर्ग रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.

ज्या अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गुरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार मदत दिली जाणार आहे. लम्पी स्कीनमुळे मृत्यू पावलेल्या गायीच्या पालनकर्त्याला ३० हजार रुपये,

बैलासाठी २५ हजार रुपये आणि गोऱ्याचा मृत्यू झाला असल्यास १६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ज्या पशुपालकांची गुरे लम्पी स्कीनने बाधित आहे, त्या बाधित जनावरांवर उपचारासाठी येणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे व आपली गुरे लसीकरण व

औषधोपचारातून लम्पी स्कीन आजारमुक्त करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT