Tur Crop Management : तुर उत्पादन वाढीसाठी याकडेही लक्ष द्या

तुर पिकात सध्या पाने पिवळी पडणे, फुलगळ, फुलधारणा न होणे इ. समस्या दिसून येत आहेत.
Tur crop Management
Tur crop ManagementAgrowon

तुर पिकात सध्या पाने पिवळी पडणे, फुलगळ (Flower Dropping) , फुलधारणा (Flowering Stage) न होणे इ. समस्या दिसून येत आहेत. या समस्यांवर उपाययोजना काय आहेत? याशिवाय तुर पिकामध्ये ओलावा (Moisture Conservation) कसा टिकवावा आणि   अवस्थेनूसार पाणी व्यवस्थापनाविषयी एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिलेली माहिती पाहुया...

Tur crop Management
Crop Management : या पद्धतीने करा सोयाबीन, तूर पिकातील कीड, रोग नियंत्रण

तुरीची पाने पिवळी का पडतात?

जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर पिकाला दिलेला नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुरीच्या झाडाची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपी ची म्हणजेच दोन किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रति एकरी कोळपणी पूर्वी द्यावे. 

Tur crop Management
Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस पिकात दोनच वेचण्या होणार

तुरीची शेंडा खुडणी कधी करावी?

तुरीचा फुटवा वाढविण्यासाठी ३० व ५५ व्या दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फुलधारणा वाढते. यंदा पाऊस उशीरा झाल्यामुळे काही ठिकाणी तुरीची पेरणीही उशीरा झाली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी तुरीची पेरणी होऊन पीक ५५ दिवसांचे झाले आहे. त्याठिकाणी तुरीची शेंडा खुडणी करावी.

फुलधारणा झाली नसेल तर काय कराल?

बऱ्याच ठिकाणी तुरीचे पीक ९० दिवसांचे होऊनही तुरीला फुलेच आलेली नाहीत त्याठिकाणी २ टक्के डीएपी ची फवारणी करावी.  

फुलगळ होत असल्यास हे करा

पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूप कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी दयावे.

ओलावा कसा टिकवाल?

पिकामध्ये उताराला आडव्या सऱ्या पाडल्यामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते. हा ओलावा पीक फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र ,सोलापूर येथील संशोधनामध्ये तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पाणी देण्याची योग्य वेळ कोणती?

कोरडवाहू क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना व तिसरे शेगांत दाणे भरतांना दयावे किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी. त्यामुळे पीक उत्पादनात अधिक वाढ होते. पाणी देताना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com