Kolhapur News: केंद्राने १५ लाख टन साखर निर्यातीबाबत घेतलेला निर्णय आणि साखरेच्या एमएसपी वाढीचा विचार आपल्यामुळेच झाल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच केला. या मागण्यांसाठी शेतकरी संघटना, साखर कारखानदार बऱ्याच काळापासून आग्रही पाठपुरावा करत असताना सिद्धरामय्या यांनी या निर्णयांचे श्रेय एकट्याकडेच घेतल्यामुळे साखर वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत..यंदा पहिल्यांदाच कर्नाटकात उसाचे आंदोलन जिल्हावार पेटले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव, बागलकोट जिल्हे आंदोलनामुळे धुमसत होते. बागलकोटमध्ये तर कारखान्याच्या आवारातील पन्नासहून अधिक ऊस वाहने पेटविली. प्रत्येक जिल्ह्यात वेगळे आंदोलन होत असल्याने खडबडून जागे झालेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाठले..Sugar Export: महाराष्ट्राशी दुजाभाव, उत्तरप्रदेशला झुकते माप.कारखानदारांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर त्यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरामय्या यांना दिलेल्या पत्रात निर्यातीचा निर्णय घेण्याबाबत उल्लेख केला होता. यानंतर चार दिवसांतच अधिसूचना निघाली. नुकतेच जोशी यांनी एमएसपी वाढीबाबतही सूतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी या दोन्हीही गोष्टींचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे..India Sugar Export: साखरेसाठी धोरणसातत्य हवे.त्याचवेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही जोशी यांना सविस्तर पत्र लिहून साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली आहे. साखरेची एमएसपी ४१०० रुपये प्रति क्विंटल करावी. इथेनॉलच्या विशेषतः बी-हेवी मोलॅसेस आणि ज्यूस, सिरप आधारित इथेनॉलच्या दरात वाढ करावी. त्याचप्रमाणे इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर वळवण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे सुमारे ३० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेवर अदा करण्यास मदत होईल, आदी बाबींकडेही पाटील यांनी केंद्राचे लक्ष वेधले आहे..शिवकुमारांकडूनही सिद्धरामयांची पाठराखणउपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही श्रेयाची पावती सिद्धरामयांनाच दिली. ते म्हणाले की, साखर कारखान्यांनी आपल्याशी व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. सात ते आठ वर्षांपासून साखरेच्या किमती सुधारलेल्या नाहीत, यावर त्यांनी भर दिला होता. म्हणून यासंदर्भात आम्ही पंतप्रधानांना विनंती केली होती. यावर तातडीने निर्णय झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.