Animal Health Agrowon
काळजी पशुधनाची

Vitamins, Minerals For Dairy Farming : जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व, खनिजे का असतात महत्त्वाची?

जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडाच्या विकासात विकृती निर्माण होतात. वार अडकतो, दुग्धज्वर होतो. जीवनसत्त्वे ही रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यांचे कार्य लक्षात घेऊन जीवनसत्त्वांचा योग्य मात्रेमध्ये पुरवठा करावा.

Team Agrowon

डॉ. एस. एस. रामटेके, डॉ. एस. बी. नाटकर

‘अ’ जीवनसत्त्व

Animal Health Vitamins Update : पुनरुत्पादन संस्था, निरोगी पेशी राखण्यासाठी आवश्यक आहे. एपिथेलीयल पेशींची अखंडता राखण्यासाठी आणि हाडांच्या निर्मितीमध्ये आवश्यक आहे. रेटीनॉल आणि रेटीनॉईक गर्भविकासासाठी आवश्यक आहेत.

कमतरतेची लक्षणे:

१) हाडाच्या विकासात विकृती निर्माण होतात. डोळे कोरडे होतात. अश्रुग्रंथीमध्ये अडथळा होतो, अश्रू निर्माण होत नाहीत.

२) दृष्टिरंध्र योग्यरीत्या तयार होत नाही. डोळ्यांतील पारदर्शकतेमध्ये बदल, छोट्या दृष्टिरंध्रामुळे डोळ्यातील मज्जातंतूना इजा होते, मज्जातंतूना कायमस्वरूपी इजा होते. यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

३) जठर, आतडे, श्‍वसनमार्ग, मूत्र व जननसंस्थेचा मार्ग व त्वचेतील संसर्ग होतो.

४) गर्भाशयात जळजळ, गर्भाशयदाह, गर्भाचा मृत्यू होणे, स्त्रीबीजातून बीज बाहेर पडण्यास उशीर होणे, गर्भपात होतो.

५) ऋतुचक्रामध्ये अनियमितता, लवकर भ्रूण मृत्यू होणे, गर्भदोष निर्माण होतात.

अतिसेवनाचे दुष्परिणाम :

डोकेदुखी, मळमळ, थकवा, भूक मंदावणे, चक्कर येते.

उपाय

दैनंदिन आहारात ताजा हिरवा चारा, मका, विविध गवतांचा समावेश करावा.

‘ड’ जीवनसत्त्व

- कॅल्शिअम, फॉस्फरस शोषण करण्यासाठी आवश्यक.

- जीवनसत्त्व ‘ड’ची गरज सूर्य किरणांपासून पूर्ण होते.

कमतरतेची लक्षणे

- माजावर न येणे, गर्भाशयाच्या आतील आवरणामध्ये दाह, वार अडकणे आणि दुग्धज्वर होतो.

- हाडामध्ये कॅल्शिअम व फॉस्फरस जमा होण्यावर परिणाम होतो, हाडे कमकुवत होतात, हाडे मोडण्याची व विकृत होण्याची अधिक शक्यता असते.

- पाय वाकणे, गुडघे व खुरांतील सांध्यावर सूज येते, पाठीला बाक येतो.

- जनावरे प्रजननात उशिरा येतात, माज उशिरा दिसून येतो. मृत, अशक्त किंवा अनियमित वाढ झालेली वासरे जन्माला येतात.

- कमतरतेमुळे ऑस्टियोमॅलेशिया आजार होतो. यामुळे हाडातील कॅल्शिअम, फॉस्फरसचे आधिकचे शोषण झालेले असते, त्यामुळे हाडे कमकुवत होतात. हाडे मोडण्याची व विकृत होण्याची शक्यता अधिक असते.

- गाभण आणि दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरसची वाढीव मात्रा आवश्यक असते. गाभण आणि दुधाळ जनावरांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस कमी पडले तर ते हाडांमधून शोषले जाते, ज्यामुळे ऑस्टियोमॅलेशिया होतो.

उपाय : योग्य प्रमाणात आहार पुरवावा.

‘ई’ जीवनसत्त्व

- रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त. जनावरांच्या शरीरामध्ये जैविक अॅण्टिऑक्सिडंट म्हणून काम करते.

- रोगप्रतिकारक प्रणालीचा विकास आणि कार्यामध्ये महत्त्वाचे.

कमतरतेची लक्षणे

- गर्भाशय आणि शुक्राणू हालचाल, गर्भधारणेचे प्रमाण, गर्भाची वाढ, प्रसूतीनंतरच्या क्रिया आणि प्रस्तूतीनंतर वार बाहेर पडण्याची क्रिया यावर विपरीत परिणाम.

- गाभण कालावधीमध्ये ‘ई’ जीवनसत्त्वासोबत सेलेनियम पूरक मात्रामध्ये दिल्यानंतर गर्भाशय स्नायू दाह, वार अडकणे आणि स्त्रीबीजात गाठीचे प्रमाण कमी.

- विण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी आणि तीन आठवड्यांनंतर पूरक व्हिटॅमिन ई २००० आययू (IU) प्रति आठवडा दिल्याने वार अडकण्याचे आणि कासदाहाचे प्रमाण कमी होते.

उपाय

हिरवा चारा, तृणधान्ये, वनस्पती तेल, चरबीयुक्त आहार, कठीण कवचाचे फळ, तेलबिया, शेंगा यांचा आहारात वापर करावा.

‘क’ जीवनसत्त्व

- यकृतामध्ये ‘प्रोथ्रोम्बीन'च्या संश्‍लेषणासाठी तसेच रक्त गोठण्यासाठी आवश्यकता.

कमतरता लक्षणे

रक्तातील प्रोथ्रोम्बीनची पातळी कमी झाल्यामुळे रक्तस्राव होतो.

उपाय

- आहारात हिरव्या गवताचा समावेश करावा.

चौकट : खनिज देण्याचे प्रमाण

खनिज देण्याचे प्रमाण (प्रति किलो खुराकातील प्रमाण)

खनिजे ---दुभती जनावरे ---कोरडी /आटलेली गाय (२४० दिवसांची गाभण)---वासरू (वय ६ महिने)

कॅल्शिअम टक्के---०.६७ ---०.४४ ---०.६४

फॉस्फरस टक्के---०.३६ ---०.२२ ---०.४१

सोडिअम टक्के---०.२२ ---०.१० ---०.१८

पोटॅशिअम टक्के ---१.०६---०.५१ ---१.००

क्लोरिन टक्के---०.२८ ---०.१३---०.२५

लोह (मिलिग्रॅम/किलो) ---१७ ---१३ ---५०

तांबे (मिलिग्रॅम/किलो) ---११ ---१२ ---१०

झिंक (मिलिग्रॅम/किलो) ---५२ ---२१ ---४०

मॅग्नेशिअम (मिलिग्रॅम/किलो) ---१३ ---१६ ---४०

कोबाल्ट (मिलिग्रॅम/किलो) ---०.११ ---०.११ ---०.१०

सेलेनियम (मिलिग्रॅम/किलो) ---०.३० ---०.३० ---०.३०

आयोडीन (मिलिग्रॅम/किलो) ---०.४४ ---०.४० ---०.६०

जीवनसत्त्वाची गरज

जीवनसत्त्व ---दुभती जनावरे---कोरडी/आटलेली गाय (२४० दिवसांची गाभण)

अ जीवनसत्त्व IU/दिवस---८०,००० ---४०,०००

ड जीवनसत्त्व IU/दिवस ---२५ ,००० ---१०,०००

ई जीवनसत्त्व IU/दिवस ---५०० ---१५०

खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण

१) दुभती गाई आणि म्हैस : ६० ते ७० ग्रॅम/जनावर/दिवस

२) मोठी वासरे, कालवड आणि भाकड जनावर : ४० ते ५० ग्रॅम/जनावर/दिवस

३) लहान वासरू : २० ते २५ ग्रॅम/जनावर/दिवस

जनावरांमध्ये कार्यक्षम उत्पादनासाठी आहारातील आवश्यक पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात आणि जैविकदृष्ट्या सर्वांत उपयुक्त अशा स्वरूपात पुरविणे आवश्यक आहे.

जनावरांच्या पुनरुत्पादनावर परिणाम करणारी खनिजे सामान्यत: खूप कमी प्रमाणात अशा गटात आढळतात, तरी कॅल्शिअम आणि फॉस्फरसची कमतरता प्रजननक्षमतेवर अधिक परिणाम करू शकते.

संपर्क : डॉ. एस. एस. रामटेके, ९७६३९६३२७०, (पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT