Pune News: जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या फक्त वनविभागापुरती मर्यादित राहिली नाही तर सामाजिक अडचण होऊन बसलेली आहे. तालुक्यातील ऊस तोडणीमुळे बिबटे सध्या सैरभैर झाले आहेत. त्यांच्यावरील नियंत्रणासाठी वनविभागाबरोबरच स्थानिक प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ, साखर कारखाना आणि नागरिक यांचे सामूहिक योगदान आवश्यक आहे. .वैज्ञानिक उपाययोजना, जंगलांचे संरक्षण, बिबट जन्मदर घटवणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती हेच या समस्येचे दीर्घकालीन समाधान ठरू शकते. पण त्यासाठी नियोजन, संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. वनविभागाला लोकाभिमुख काम करून स्थानिकांचा विश्वास संपादन करून बिबट समस्येवर काम करणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ तसेच शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे..Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू.उस तोडणी दरम्यान बिबट्याची बछडी ठिकठिकाणी मिळून येऊ लागल्याने ती सुरक्षितरित्या परत मादीबरोबर जाण्यासाठी वनविभागाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. कारण बछडी दिसून न आल्याने मादी बिबट हिंस्र होऊन मानव बिबट संघर्षात वाढ होते. त्यामुळे बिबट बछडी मिळून आल्यावर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ येथे पिंजरा लावून मादी बिबट पकडा म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी करतात..leopard sighting: सुखापुरी मंडलात बिबट्याचा वावर.त्यामुळे वनविभागाकडून तेथे मादी बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावतात. जंगलात अन्न पाण्याची वणवा यामुळे बिबट्यांनी जंगल सोडले असून, बागायती क्षेत्रात ऊस, केळी व इतर शेतामध्ये राहू लागले. मात्र आता जी बिबट्याची पिढी आहे, तिचा जन्मच उसात किंवा इतर बागायती क्षेत्रात झाला असून, बिबट्यांनी स्वतःच्या जीवनचर्येत त्याप्रमाणे बदल केला आहे..अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर वावरअहिल्यानगर-कल्याण महामार्गावर बुधवारी (ता.१२) ओतूर आणि उदापूरदरम्यान हॉटेल वृंदावनसमोर संध्याकाळी सहाच्या सुमारास बिबट्याची एका दुचाकीला धडक बसून एक युवक जखमी झाला. तसेच त्यानंतर रात्री ११.३० ते १२ दरम्यान याच ठिकाणी बिबट्या महामार्ग ओलांडताना दिसला व परत एका वाहनाच्या मागे लागलेला दिसून आला. तसेच त्या आधी याच महामार्गावर तसेच डुंबरवाडी गावच्या हद्दीत मोरीच्या कठड्यावर बिबट्याचा वावर आढळून आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.