Amravati News: सातत्य, सचोटी आणि मेहतनीच्या बळावर शेतीपूरक व्यवसाय आर्थिक सक्षमतेचा पर्याय ठरतो, याचा आदर्श अमरावती येथील मेटकर कुटुंबीयांनी घालून दिला आहे. रोज एक लाखांवर अंडी उत्पादन असलेल्या या व्यवसायात शिवराज मेटकर यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांची तिसरी पिढी राबत आहे..बडनेरा येथील रहिवासी माणिकराव मारोतराव मेटकर हे वनविभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यामुळे भूमिहीन असलेल्या मेटकर कुटुंबीयांनी आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर १९८४ मध्ये पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली. १०० पक्ष्यांपासून सुरू झालेल्या या व्यवसायात १९९५ पर्यंत पक्ष्यांची संख्या चारशेवर गेली..Success Story: पूरक उद्योगातून सक्षम झाल्या महिला .१९९५ मध्ये आईच्या माहेरकडून मिळालेली शिरसगाव बंड येथील चार एकर शेती विकून त्याच पैशातून बडनेरा येथे एक एकर शेती खरेदी केली. ही जमीन बॅंक ऑफ इंडियाला गहाण ठेवत पाच लाख रुपयांचे कर्ज घेत पोल्ट्रीचा विस्तार ४००० पक्ष्यांवर करण्यात आला. २००६ मध्ये १८ हजार पक्ष्यांच्या संगोपनाचा पल्ला गाठण्यात आला..त्यासोबतच पैशाच्या बचतीतून दहा एकर जमीन खरेदी करण्यात आली. २००६ मध्ये ‘बर्ड फ्लू’ आला. त्यामुळे दोन वर्षे या व्यवसायातून नाइलाजाने माघार घ्यावी लागली. या दरम्यान व्यवसायाची सूत्रे रवींद्र मेटकर यांच्याकडे होती. २००८ मध्ये पुन्हा शेती गहाण ठेवत बॅंक ऑफ इंडियाकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. यातून ब्रॉयलर ऐवजी २० हजार पक्षी असलेला लेअर फार्म सुरू केला. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी १० हजार पक्षी वाढीचे उद्दिष्ट गाठण्यात आले..Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन.सोबतच बॅंक कर्ज परतफेडीतही सातत्य होते. २०१३ मध्ये कर्ज भरणा झाल्यानंतर पुन्हा ६० लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली. या माध्यमातून २०१८ पर्यंत कुक्कुट पक्ष्याची संख्या १ लाख ५० हजारांवर पोहोचली. त्यानंतर २०२० मधील कोरोनापासून रवींद्र मेटकर यांचा मुलगा शिवराज याने या व्यवसायाची सूत्रे आपल्या हाती घेतली..बारामती कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर झालेल्या शिवराज याने ३० हजारांवर पक्ष्यांसाठी नव्याने हायटेक फार्म उभारला आहे. तीन कोटी रुपयांचा यावर खर्च झाला असून त्यासाठी कोणतेही कर्ज काढण्यात आले नाही. उलट शेतीक्षेत्र ५० एकरांवर पोहोचले आहे. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे सुमारे १ लाख ८० हजार लेअर कुक्कुट पक्षी आहेत. त्यातून रोज एक लाखांवर अंडी उत्पादन होते. याची विक्री मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात होते..वडील माणिकराव, भाऊ दिलीप, प्रमोद सामूहिकपणे या व्यवसायात राबतात. याच व्यवसायाच्या बळावर कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षित करता आले ही समाधानाची बाब आहे. आता माझा मुलगा शिवराजच्या माध्यमातून तिसरी पिढी यात राबत आहे. आर्थिक उत्कर्षाच्या परिणामी त्याला ५५ लाख रुपयांचे डिफेंडर हे वाहन घेता आले. विदर्भात हे केवळ शेतीपूरक व्यवसायामुळे शक्य झाले. रवींद्र मेटकर, संचालक, मातोश्री पोल्ट्री फार्म, अंजनगावबारी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.