Goat Rearing  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Rearing : शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनात या गोष्टी महत्वाच्या

शेळ्यांच्या शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.

Team Agrowon

शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा (Green Fodder), सुका चारा (Dry Fodder) व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग म्हणजे ड्राय मॅटर (Dry Matter) हा खूप महत्वाचा असतो.

चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्वे ही कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्यामध्ये वेगळे असते, जसे की, लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये ८० ते ९० % पाणी असते त्यात कोरडा भाग १० ते २० % असतो.

तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त १० % पाणी असते व कोरडा भाग जवळपास ९० % असतो. शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.

शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात. शेळीला तिच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक असते.

या दृष्टीने एका प्रौढ शेळीला दररोज साधारण ३ ते ४ किलो हिरवा चारा, ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी २०० ते २५० ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा. कारण १५ किलो वजनाच्या पुढे १०० ग्रॅम कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा द्यावा व तो पुढे प्रति ५ किलो वजनास ५० ग्रॅम याप्रमाणे वाढवत जावे. उदाहरणार्थ २० किलो वजनाच्या शेळीला १५० ग्रॅम. 

दूध देणाऱ्या शेळ्यांसाठी उपयुक्त खाद्य पुढील प्रमाणे तयार करावे.

मका ३७ %

शेंगदाणा पेंड २४ %

गव्हाचा कोंडा २० %

खनिज मिश्रण १ %

चुना २.५ %

मीठ ०.५ % 

हरभरा १५ % 

वरील संतुलित आहारामध्ये १८ % प्रथिने आणि ७५ % एकूण पचनीय घटक असतात.

पैदाशीचे बोकड आणि शेळ्यांसाठी संतुलित आहार तयार करण्याचे सूत्र.

गव्हाचा किंवा तांदळाचा भुसा ४५ %

शेंगदाण्याची पेंड २० % 

मका किंवा ज्वारी १२ %

साखरेची मळी १० % 

डाळीचा भरडा १० %

मीठ १ %

चुना १ %

वरील संतुलित आहारामध्ये पंधरा % प्रथिने आणि ६५ ते ७० % एकूण पचनीय घटक आहेत.  

Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?

Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT