Goat Rearing : मांस उत्पादनासाठी कोकण कन्याळ शेळी

कोकण कन्याळ जातीची शेळी महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात आढळून येते.
Konkan Kanyal Goat
Konkan Kanyal GoatAgrowon

कोकण कन्याळ जातीची शेळी (+Konkan Kanyal Goat) महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात आढळून येते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.

Konkan Kanyal Goat
शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये काय आहेत ?


- या शेळयांचा रंग काळा असतो. शेळयांच्या तोंडावर व कानावर पांढऱ्या रंगाच्या पट्टया असतात.
- चेहरा चपटा व लांबट असतो व पाय लांब असतात. ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.
- एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते.
- करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते.
- पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते.
- ही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे.
- दोन वेतातील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे.
- भाकड काळ हा ८४ दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com