Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांतील धनुर्वात : लक्षणे कारणे आणि उपाय

tetanus in animals : साध्या जखमेतूनही जनावरांना धनुर्वात या जिवघेण्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. धनुर्वात हा जनावरे आणि मानसाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे.

Team Agrowon

Livestock Management : साध्या जखमेतूनही जनावरांना धनुर्वात या जिवघेण्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. धनुर्वात हा जनावरे आणि मानसाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे.

धनुर्वाताचे जिवाणू हे माती आणि बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात. माती, धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर धनुर्वाताचे जिवाणू मोठ्या संख्येने असतात. जखमेचा संपर्क माती, धुळीसोबत आल्यास किंवा गंजलेल्या लोखंडाच्या वस्तूने जखम झाल्यास या जिवाणूचा संसर्ग होऊ शकतो. हे जिवाणू शरीरात वाढीदरम्यान विष तयार करतात. या विषाचा थेट परिणाम मज्जातंतूंवर होतो. त्यामुळे जनावराचा चेहरा आणि इतर स्नायू आखडले जातात.  


विशेष म्हणजे या आजाराची लागण बाधित प्राण्याच्या संपर्कातून, खाद्य, पाणी तसेच हवेतून होत नाही. तर कोणत्याही प्रकारची जखम तसेच अगदी साध्या ओरखड्यातूनही हे जिवाणू शरीरात शिरतात.  गाय, कुत्रा, मांजर आणि वराहामध्ये या आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते. पण शेळ्या, मेंढ्या, घोडा आणि मानसांमध्ये धनुर्वाताच्या जिवाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो. नवजात पिलांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तत्काळ संक्रमण होऊन धनुर्वात उद्‌भवू शकतो.


आजाराची लक्षणे  

शरीरात जिवाणूंनी प्रवेश केल्यानंतर ३ ते १४ दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात. ज्या ठिकाणी हे जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात, त्या ठिकाणापासून विष रक्तप्रवाहात मिसळून चेतापेशींपर्यंत पोहोचून चेतापेशींना इजा करते. विषाचा परिणाम मेंदू, मज्जासंस्था तसेच पाठीच्या कण्यावर होतो. नसा काम करण बंद करतात. त्यामुळे स्नायूंची हालचाल बंद होते.

स्नायू आखडतात. जनावराला हालचाल करता येत नाही. जनावर खाली पडते. जबडा उघडता व बंद करता येत नाही. पाणी पिणे, खाद्य खाणे बंद होते. शरीरातील सर्व स्नायू आकुंचन पावतात. योग्य उपचार वेळेत न मिळाल्यास जनावराचा मृत्यू होऊ शकतो.  

प्रतिबंध आणि उपाय

जनावरांमध्ये विशेषतः घोड्यांमध्ये टेटॅनस टॉक्सोइडचे (टी.टी.) लसीकरण करावे. गाभण जनावरांना धनुर्वाताची लस द्यावी. त्यामुळे मातेकडून अर्भकांना प्रतिकारशक्ती मिळते. अर्भकांना धनुर्वात होत नाही. जखम झाल्यास, ती स्वच्छ करावी. जखम धुण्यासाठी योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा. गोठ्यांची स्वच्छता ठेवावी. जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचा वापर करावा. जखमी जनावराला धनुर्वाताची लस द्यावी. हा आजार जर टाळायचा असेल तर आपल्या जनावरांना जखमा होऊ न देण हेच चांगल.  

--------------

माहिती आणि संशोधन - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT