Farm Loan Recovery Maharashtra: खासगी बँका अजूनही कर्ज वाटप करण्यासाठी उत्सुक नाहीत. पुढच्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्याला कर्ज वाटप झाले पाहिजे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. पतसंस्था ते जिल्हा बँक, खासगी ते राष्ट्रीयीकृत बँक असो, कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना फोन करायचा नाही. शेतकऱ्याला फोन केला आणि त्याने जीवन संपवले तर त्यासाठी बँका, प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला..सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरु नये. अवैध सावकाराचे कंबरडे मोडू आणि जे वैध सावकार आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला फोन करायचा नाही, असे त्यांनी सुनावले. मंत्री बावनकुळे यांनी रविवारी जळगाव जिल्ह्याचा दौरा करुन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. .Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी.कोणीही जर कर्जवसुलीसाठी तगादा लावत असेल तर पोलीस अधीक्षक अथवा जिल्ह्याधिकाऱ्यांना अर्ज करावा. कुठलीही फायनान्स कंपनी, खासगी बँक, पतसंस्थेने शेतकऱ्याला फोन करायचा नाही, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. .Sharad Pawar: शेतीशी संबंधित कर्ज १०० टक्के माफ करा, शरद पवारांची मागणी, दुष्काळी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद .दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आवश्यक उपाययोजना, शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक व वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले..त्यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान पातरखेडे येथील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसोबत सहभोजन करत संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी धुळे जिल्ह्याचाही दौरा केला. त्यांनी कासविहीर येथील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. .दुष्काळग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. त्याला दिवाळीपर्यंत मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचे सहकार विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.