Livestock Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Registration : जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करा : डॉ. बोर्डे

Livestock System : राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा २७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

Team Agrowon

Satara News : राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा २७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

शासन निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर, आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची माहिती जनावरांचे वय, लिंग, जात, मिल्कींग स्टेटस् आदी अद्ययावत करणे आवश्यक आहे.

१ जूनपासून इअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही. तसेच पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. केंद्र व राज्य शासनाकडून देय आर्थिक सहाय देय होणार नाही, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.

राज्यातंर्गत जनावरांची वाहतूक करता येणार नाही. मालकी हस्तांतर होणार नाही. वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून इअर टॅगिंग करून घ्यावे व त्याच्या अचूक नोंदी भारत पशुधन प्रणालीवर तत्काळ करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT