Team Agrowon
ऋतूबदलामुळे होणारे साधे आजार, सर्दी, साधा खोकला किंवा साधा ताप, ज्यावर घरगुती उपाय किंवा वेदनाशामक औषधे किंवा ताप कमी करणाऱ्या औषधांचा वापर करण्याचा सोडून प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर केला जातो.
अलीकडे हे जिवाणू इतके प्रबळ झाले आहेत, की आपल्याकडील सर्वात प्रभावी प्रतिजैविकेसुद्धा निष्प्रभ ठरत आहेत. हे टाळण्यासाठी प्रतिजैविके वापरताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
औषधोपचार करताना तज्ञ वैद्यक किंवा पशुवैद्यक यांच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा संपूर्ण कोर्स पक्षी, प्राणी, माणसांसाठी करावा.
प्रतिजैविकांचा उपचार पशू किंवा पक्ष्यांवर चालू असताना प्रतिजैविकानुसार शेवटच्या डोसनंतर कमीत कमी ७२ तास अशा प्राणिजन्य अन्नपदार्थांचा समावेश मानवी आहारात करू नये.
आजारी जनावराचे दूध काढल्यानंतर वापरात न आणता खड्ड्यामध्ये ओतून त्याची विल्हेवाट लावावी.
प्राणी, पक्ष्यांवर प्रतिजैविकांचा वापर आजार दूर करण्यासाठी होत असेल तर अशा प्राणी, पक्ष्यांची कमीत कमी ७२ तास कत्तल करू नये, जर दुर्दैवाने करावी लागली तर असे मांस खाण्यासाठी वापरू नये.
अल्प प्रमाणात प्रतिजैविकांचा अंश दुधाद्वारे किंवा मांसाद्वारे आहारातून गेल्याने शरीरात असलेले जिवाणू प्रतिजैविकांच्या विरोधात स्वतःमध्ये जनुकीय बदल करून आणतात आणि प्रतिरोधक्षमता वाढते, ज्याचा प्रसार इतर जिवाणूंमध्ये सुद्धा होतो.