PPR Disease Of Sheep and Goat Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Diseases : शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर आजाराची लक्षणे ओळखा

शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर हा जीवाणूजन्य आजार असून तो अतिसंसर्गजन्य आहे. पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स.

Team Agrowon

शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर (PPR) हा जीवाणूजन्य आजार (Bacterial Disease) असून तो अतिसंसर्गजन्य आहे. पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स. पीपीआर भारतात सर्वप्रथम १९७७ मध्ये तमिळनाडू येथे आढळून आला. हा रोग मॉरबिली नावाच्या विषाणूमुळे (Virus) होतो. पीपीआर आजार मेंढ्यापेक्षा शेळ्यांमध्ये आणि पाच ते आठ महिने वयोगटांच्या करडांमध्ये जास्त प्रमाणात होतो. 

आजाराची लक्षणे काय आहेत ?

बाधित शेळ्या-मेंढ्यांना अचानक ताप आल्याने शेळ्या-मेंढ्या उदासीन, झापड आल्यासारख्या दिसतात.

डोळे, नाकातून सुरुवातीला पातळ आणि नंतर जाड, पिवळसर स्राव बाहेर येतो.

शेळ्या-मेंढ्या बाहेर लेंड्या बाहेर टाकत असताना रक्त बाहेर येते.

श्वास घेताना, खोकताना त्रास होतो.

अतितीव्र स्वरूपामध्ये शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यु होतो.

औषधोपचार

हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे प्रभावी औषधोपचार नाही, पण लक्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि जिवाणूंचे अधिक संक्रमण टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवके, वेदनाशामक इंजेक्‍शन तीन ते पाच दिवसांसाठी द्यावीत.

तोंडातील जखमा खाण्याच्या सोड्याच्या २ टक्के द्रावणाने किंवा १ टक्के पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवावी. 

आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या-मेंढ्यांत लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. तीन महिने वयाची व त्यावरील वयाच्या सर्व निरोगी करडांना लसीकरण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT