Gopal Ratna Award Agrowon
काळजी पशुधनाची

GopalRatna Award : ‘गोपाल रत्न’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याची संधी

गोपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गोपालकांना केंद्र सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः गोपालन (Cow rearing) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गोपालकांना केंद्र( Center for cowherds) सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी गोपालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) केले आहे. यासाठी https://awards.gov.in ह्या लिंकवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यामध्ये पात्र पशुपालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

गोपाल रत्न पुरस्कार-२०२२ साठी पुरस्कारामध्ये प्रामुख्याने तीन विभागांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक विभागातून तीन याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम विभागात गायींच्या ५० जाती आणि म्हशींच्या १७ जातींपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी जातीची देखभाल करणारे शेतकरी, पशुपालक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

दुसरा विभागात राज्य, केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ, राज्य, दूध महासंघ, एनजीओ आणि इतर खासगी संस्थांचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ‍ ज्यांनी किमान ९० दिवसांचे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण घेतले आहे ते पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

तिसऱ्या विभागात सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था गावपातळीवर स्थापन केलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतलेली आणि सहकारी कायदा, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे, आणि दररोज किमान १०० लिटर दूध संकलन करते आणि किमान ५० शेतकरी आहेत सदस्य, दूध उत्पादक सदस्य दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप

पुरस्काराच्या स्वरुपात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला अनुक्रमे पाच, तीन आणि दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे स्वरूप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Crop Survey: डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी राज्याला २६ कोटी; SC प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीची मंजुरी

Sea Link: उत्तन-विरार सागरी सेतू उभारण्यात येणार

Sugar Factory: विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

Soybean MSP Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी प्रशासन सज्ज

Agrowon Podcast: सोयाबीनचे दर स्थिर, कापूस आवक सुधारतेय; काकडी व लसणाला वाढीला उठाव, मोसंबीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT