Animal Care : सोन्याऐवजी म्हैस खरेदीचा हट्ट धरावा ः विश्‍वास पाटील

गोकुळच्या विकासात महिलांचे योगदान मोठे आहे. दिवसभर शेतशिवारात काम करताना पशुधनाची काळजी वाहणाऱ्या महिला शेतकरी खऱ्या कौतुकास्पद आहेत.
Buffalo Rearing
Buffalo RearingAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘‘गोकुळच्या (Gokul Milk) विकासात महिलांचे योगदान (W omens Contribution In Dairy Business) मोठे आहे. दिवसभर शेतशिवारात काम करताना पशुधनाची काळजी (Animal Care) वाहणाऱ्या महिला शेतकरी खऱ्या कौतुकास्पद आहेत. महिलांनी आता सण आणि समारंभात सोने नाणे याचा हट्ट न करता म्हैस खरेदीचा आग्रह धरावा.

Buffalo Rearing
गोकुळचे शेतकरीच अमूलचं आव्हान परतवतीलः मुश्रीफ

पशुधनाचे मोल मोठे आहे.’’ असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केले.

Buffalo Rearing
Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यात ४२९ पशुधनाला ‘लम्पी स्कीन’ची बाधा

गोकुळ दूध संघातर्फे ताराबाई पार्क येथील संघाच्या कार्यालय परिसरात झिम्मा-फुगडी स्पर्धा झाल्या. स्पर्धेत दोन हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या.

गोकुळचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. झिम्मा स्पर्धेत कपिलेश्‍वर (ता. राधानगरी) येथील गणेश दूध संस्था, माजनाळच्या (ता. पन्हाळा) सुवर्णा दूध संस्था, पंडेवाडी (ता. राधानगरी) येथील शा. गो. पाटील दूध संस्था, हनुमान दूध संस्था घोटवडे, महालक्ष्मी दूध संस्था व्हनूर (ता. कागल) श्रीकृष्ण दूध संस्था बहिरेश्‍वर (ता. करवीर) आदी संस्थांनी यश मिळवले. सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com