Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : आता जनावरांसाठीही ‘पीपीई किट’चे संरक्षण

PPE Kit Protection For Animals : कोरोना महामारीत माणसांना ‘पीपीई किट’चे संरक्षण मिळाले. त्याप्रमाणे जनावरांमध्ये आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्‍वभूमीवर हा प्रयोग आता जनावरांमध्येही केला जातो आहे.

Team Agrowon

Solapur News : कोरोना महामारीत माणसांना ‘पीपीई किट’चे संरक्षण मिळाले. त्याप्रमाणे जनावरांमध्ये आलेल्या ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्‍वभूमीवर हा प्रयोग आता जनावरांमध्येही केला जातो आहे.

सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुकच्या जितेंद्र बाजारे या शेतकरी मुलाने जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती सुरू केली आहे. बाजारे यांनी वेगवेगळ्या वयाच्या आणि वजनांच्या जनावरांसाठी पीपीई किट्‍स‌ तयार केले आहेत. त्या माध्यमातून पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आशेचा किरण मिळाला आहे.

महाराष्ट्रात सध्या ‘लम्पी’चा प्रादुर्भाव सर्वच भागात दिसतो आहे. शेतकऱ्यांवर हे कोरोनाप्रमाणेच एक संकट आहे. विशेषतः दुभत्या असणाऱ्या गायवर्गीय जनावरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. तो संसर्गजन्य असल्याने राज्यभरातील लाखोंच्या संख्येने पशुधन मृत्युमुखी पडले. त्यामुळे गोठेच्या गोठे रिकामे होताहेत. अगोदरच अस्मानी अन् सुलतानी संकटांशी टक्कर देता देता बेजार झालेल्या शेतकऱ्यांपुढे ‘लम्पी’चे नवे संकट उभे आहे.

लाखमोलाचे पशुधन डोळ्यांदेखत पाय खोडून तडफडत मृत्युमुखी पडतेय. त्याला आधार देण्यासाठी महूदचे शेतकरी आणि गारमेंट व्यावसायिक जितेंद्र बाजारे यांनी चार महिन्यांच्या संशोधनातून जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती केली आहे.

जे किट मुख्य लम्पीसह अन्य संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. त्यांनी तयार केलेल्या किटची अनेक पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी चाचणी घेऊन लम्पीच्या बचावासाठी ते योग्य असल्याचा शेरा दिला आहे.

...असे मिळतेय ‘पीपीई’ किटचे संरक्षण

जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या पीपीई किटसाठी लॅमिनेटेड ओवन कपड्याचा वापर करण्यात आला आहे. पीपीई किट जनावराच्या अंगावर चढविल्यानंतर डास किंवा माशीचा दंश जनावराच्या थेट शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी, दंशाअभावी जनावर बाधित होऊ शकत नाही.

पीपीई किटची ठळक वैशिष्ट्ये ः

- किट धुऊन स्वच्छ करता येते.

- बुरशीनाशक औषधे ठेवण्यासाठी किटमध्ये विशिष्ट ठिकाणी कप्पे.

- किट घातल्यानंतर स्टेथेस्कोप लावता यावा, यासाठी पुढच्या पायाच्या डाव्या बाजूवर सोय.

- लम्पीचा प्रार्दुभाव राहतो २८ दिवस, या काळात दोन किट पुरेशी.

- किटसाठी पिवळा, नीळा आणि पांढरा रंग वापरल्याने जनावरे रंगाला बुजत नाहीत.

- पीपीई कीट घातलेले जनावर विलगीकरणात ठेवणे, सावलीत बांधणे आवश्यक.

- थंडीत येणाऱ्या लाळ, खुरकूत या संसर्गजन्य आजारापासून देखील किटमुळे मिळेल संरक्षण

पशुधनासाठी तयार केलेले पीपीई किट लम्पीवर प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांना माफक दरात हे किट देत आहोत. या किटला पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- जितेंद्र बाजारे, पीपीई किट्‍स‌ निर्माते, महूद बुद्रुक, ता. सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT