Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

Animal Care : पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या आजारांची लागण होते. त्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या आजारांची लागण होते. त्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेंतर्गत १० लाख ९२ हजार जनावरांना लस देण्यात आली. तसेच काही वर्षांपासून जनावरांत लम्पीचाही प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पाच लाख ११ हजार जनावरांना लम्पीचीही लस देण्यात आली.

अशाप्रकारे एकूण १६ लाख तीन हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांना जंतनाशके दिल्यानंतर मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

पावसाळ्यात म्हैसवर्गीय जनावरांना घटसर्प, गायवर्गीय जनावरांना फऱ्या व शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषार आजारांची लागण होते. विशेषतः नदीकाठच्या भागात याचा जास्त प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे.

त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून लस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत गायवर्गीय जनावरांत लम्पी या त्वचारोगाचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारांना रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे.

लसीकरणावर एक दृष्टिक्षेप

घटसर्प : ३,४५,७०२

फऱ्या : १,७४,४९४

आंत्रविषार : ५,७१,८५४

एकूण : १०,९२,०४९

लम्पी : ५,११,०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT