Animal Vaccination : पशुधनांना ९० टक्के लसीकरण

Animal Health Care : पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे.
FMD Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे. जिल्ह्यात पशुधानाचे पावसाळ्यापूर्वीचे ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंर्वधन विभागाने दिली.

जिल्ह्यात विसाव्या पशुगणनेनुसार १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची संख्या आहे. जिल्ह्यातील जनावरांना पावसाळ्यात घटसर्प, फऱ्या आणि शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार असे आजार होतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे पावसाळ्यात पूर्वीचे लसीकरणाची मोहीम सुरू केली.

FMD Vaccination
Animal Vaccination : शिरोळ तालुक्यात ४० हजार जनावरांना लसीकरण

शासनाकडून ८ लाख ४६ हजार ८०० इतक्या लसी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील जनावरांच्या संख्या आणि त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तालुका पातळीवर प्रत्येक गावातील पशूधनाला लसीकरण करण्याचे नियोजन विभागाने केले. तसेच नदीकाठच्या पूरपट्ट्यामध्ये १०४ गावांचा समावेश होतो. या पूरपट्ट्यातील गावातील लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे.

FMD Vaccination
Animal Vaccination: मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती

आजअखेर ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत लसीकरण पूर्ण होईल. जनावरांना लम्पी स्कीनसारखे आजार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने काळजी घेत २ लाख २२ हजार ७०० इतक्या लसी उपलब्ध केल्या आहेत.

विसाव्या पशुगणनेतील आकडेवारी

गायवर्ग ३२४७५६

म्हैसवर्ग ४९३९९८

मेंढी १३०७५४

शेळी ४५४१२५

एकूण १४०३६३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com