Khamgaon Cattle Breed  Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Cow Breed : खामगाव गोवंश ः विदर्भातील वातावरणास अनुकूल

Khamgaon Cattle Breed : पश्चिम विदर्भातील उष्ण वातावरणात तग धरून काळ्या रेगुर मातीमध्ये शेती,मशागतीचे कामे करण्याचे सामर्थ्य खामगाव या गोवंशात निसर्गाने दिले आहे.

Team Agrowon

Indian Cattle Breed : पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील ‘खामगाव’ ही जनावरांची बाजारपेठ म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने येणारे स्थानिक गोधन हे खामगाव किंवा खामगावी नावाने ओळखले जात असे. खामगाव हे पांढराशुभ्र कापूस आणि चांदीसाठी विशेष प्रसिद्ध बाजाराचे ठिकाण असल्याने येथे स्थानिक कास्तकार, पशुपालक, व्यापारी यांचा मोठा राबता राहिला आहे.

त्यामुळे सुमारे १२५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी, इथल्या संपन्न बाजारपेठेवरून स्थानिक गोवंशाला ‘खामगाव’ हे नाव दिले. खामगाव गोवंशाचे बैल शेतीकामासाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले आहे. विदर्भात चराईसाठी भटकंती करणाऱ्या गुजरातच्या गीर आणि मध्य प्रदेशातील निमारी गायींचा स्थानिक देशी गोवंशासह संकर होत ‘खामगाव गोवंश’ विकसित झाल्याची पशुपालकांत मान्यता आहे.पश्चिम विदर्भातील उष्ण वातावरणात तग धरून काळ्या रेगुर मातीमध्ये शेती,मशागतीचे कामे करण्याचे सामर्थ्य खामगाव या गोवंशात निसर्गाने दिले आहे.

गोवंशाची वैशिष्टे

पश्चिम विदर्भातील उष्ण वातावरणाशी अनुकूलपणे जुळवून घेत मुख्यत्वे शेती आणि ओझे वाहण्याच्या उपयुक्ततेचा हा गोवंश आहे. वैशिष्ट्यपूर्ण तपकिरी रंगाची शिंगे, नाकपुड्या, खुरे खामगाव गोवंशाचे वेगळेपण राखून आहेत. सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्ती या गुणांमुळे स्थानिक शेतकरी शेतीपूरक कामांसाठी खामगाव बैलजोडी पसंत करतात.

गायींमध्ये दूध उत्पादन क्षमता तुलनेने कमी असली तरी प्रजननक्षमता उत्तम आहे. आजही पश्चिम विदर्भातील गोपालक मोठ्या आवडीने खामगाव गोवंशाचे पालन शेतीकामासाठी करताना दिसतात. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे डॉ. कुरळकर यांच्या नेतृत्वात खामगाव गोवंशाचे संशोधन सुरु आहे. राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र गोवंश जात म्हणून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जनावरे अंगकाठीने उमदे, मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. रंगाने प्रामुख्याने तपकिरी (गाजऱ्या) रंगाच्या असून काही प्रमाणात तपकिरी व पांढऱ्या रंगाचे मिश्रण आढळून येते.

गोवंशामध्ये फिकट / गडद तपकिरी (खामगावी), तपकिरी रंगावर पांढरे ठिपके (बहाळा) आणि पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके (सोनारी) अशा तीन उपप्रकार प्रामुख्याने आढळतात. रंगावरून स्थानिक पशुपालकांत ‘गाजऱ्या’ या नावाने खामगाव गोवंश सुपरिचित आहेत.

डोके मध्यम आकाराचे, कपाळ किंचित फुगीर, आखूड शिंगे आणि मान असलेले दिसून येते. शिंगे, नाकपुड्या, कानाची आतील बाजू आणि खुरे प्रामुख्याने फिकट तपकिरी रंगाची आहेत. शिंगे मागील बाजूला वळलेली आणि किंचित वरच्या दिशेने जाणारी असतात. वशिंड लहान ते मध्यम आकाराचे असून मानेची पोळी लहान आकाराचे दिसून येते.

शेपटीचा गोंडा तपकिरी किंवा मिश्र रंगाचा असतो. कासेची बांधणी लहान व कटोऱ्याच्या आकाराची असून सडांचा आकार दंडगोलाकार व सडांची टोके गोलाकार आढळून येतात.

साधारणतः कासेचा रंग तपकिरी आढळतो. दुग्धशिरा ठळकपणे दिसून येत नाही.

गोवंश काटक असून पश्चिम विदर्भातील उष्ण व नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेणारा आहे.

खामगाव गोवंशाचे शारीरिक वजन सरासरी ३०० किलोग्रॅम असते. खामगाव गायींचे प्रतिदिन दूध उत्पादन १ ते १.५० किलोग्रॅम असून एका वेतात सरासरी ४०० किलोग्रॅम इतके दूध उत्पादन असल्याचे नोंदले आहे.

- डॉ. प्रवीण बनकर,

९९६०९८६४२९

(पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT