Market Bulletin: सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आजही स्थिर होता. सोयाबीनची बाजारातील आवक सध्या घटलेली आहे. खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याचाही आधार सोयाबीनला मिळत आहे. तर यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. सध्या बाजारात सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सोयाबीनला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. तर बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .संत्रा आवक टिकूनराज्यातील बाजारात संत्र्याची आवक टिकून आहे. यंदा संत्रा पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारातील संत्रा आवक सरासरीपेक्षा कमी आहे पण मागील काही दिवसांपासून टिकून दिसत आहे. संत्रा पट्ट्यातील बाजारांमधील आवक तुलनेत अधिक दिसत आहे. तर बाजारात सध्या संत्रा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयाने विकला जात आहे. संत्र्याला सध्या मागणी चांगली आहे. वाढत्या उन्हासोबत संत्र्याला उठाव वाढेल. त्यामुळे दरही टिकून राहण्यास मदत होईल, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर.गहू नरमलादेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गव्हाची आवक वाढत आहे. गहू काढणीला वेग येत असून अनेक बाजारातील आवक वाढलेली आहे. यंदा गव्हाचे उत्पादनही चांगले आहे. यंदा देशात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. अवकेचा दबाव वाढत असल्याने गव्हाचे भावही नरमले आहेत. सध्या गव्हाला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाची बाजारातील आवक पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या भावावरील दबावही टिकून राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .Sugar Purchase Enquiry: साखर खरेदीसाठी केवळ चौकशीच; करार नाहीत .हरभऱ्यावरील दबाव कायमदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. सध्या बाजारातील हरभरा आवक चांगली सुरु आहे. आवकेचा दबाव कायम आहे. दुसरीकडे हमीभावाने खरेदी सुरु असली तरी पीक जास्त असल्याने भाव दबावातच आहेत. यंदा हरभऱ्याला केंद्र सरकारने ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर बाजारात सध्या ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान हरभऱ्याची विक्री केली जात आहे. हरभऱ्याची आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा दरावरही काही आठवडे दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..डाळिंबाला उठावराज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारले आहेत. सध्या डाळिंब बाजारात ८ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.