Poultry Framing Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry : लेअर पोल्ट्रीला साथ देशी गोसंगोपनाची

अमरावती जिल्ह्यात टाकळी बु. येथील उच्चशिक्षित पवन लुंगे यांनी १८ वर्षे बॅंकिंग क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर शेतीचा व्यासंग जपत आज पूर्णवेळ लेअर पक्षी पोल्ट्री व्यवसाय (Layer Poultry Farming) व गीर गायींच्या संगोपनात (Cow Rearing) ते रमले आहेत. जोडीला १८ एकर शेतीत फळबाग विकसित केली आहे. शेती व पूरक अशा जोडीतून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यात टाकळी बुद्रूक येथे पवन लुंगे यांची शेती आहे. त्यांनी बीएस्सी ॲग्री व एमबीए अशा दोन पदव्या घेतल्या आहेत. शिक्षणानंतर त्यांनी बॅंकेत नोकरी करण्यास सुरवात केली. नोकरी सुरू असताना सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांनी शेती विकसित (Agriculture Development) करण्याचे ठरविले. पवन अमरावतीत राहतात. टाकळी गाव तेथून २० किलोमीटरवर आहे. त्यामुळे ये-जा करण्यास आणि व्यवस्थापनास सुलभ होणार असल्याने त्यांनी याच भागात शेती खरेदीचा निर्णय घेतला. आज त्यांची १८ एकर शेती आहे.

पोल्ट्री व्यवसायाची उभारणी

पवन यांचे सासरे विजय छतवाणी (अमरावती) यांचा सेलू गुंज गावी लेअर पक्ष्यांचा (अंडी उत्पादन) फार्म आहे. सुमारे १५ हजार पक्ष्यांचे संगोपन होते. तेथेच पवन यांना या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्यातील माहिती व बारकावे जाणून घेत पवन यांनीही सुमारे पाच वर्षांपूर्वी आपल्या पोल्ट्री फार्मची उभारणी केली. ‘एव्हीके ऑर्गेनिक ॲग्रो फार्म’ असे नामकरण या शिवाराचे केले आहे.

सुरवातीला १५ हजार पक्षी संगोपनाच्या उद्देशाने २४० बाय ४० फूट आकाराचे शेड उभारले. शेड उभारणी, पक्षी अशी एकूण गुंतवणूक ९० लाख रुपयांच्या घरात गेली. त्यासाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले. उर्वरित रक्‍कम घरून जोडण्यात आली. हैदराबाद येथील कंपनीकडून पक्षांची खरेदी केली.

अनुभवाच्या बळावर व्यवसायात काही प्रमाणात वृद्धी करण्यास टप्प्याटप्प्याने सुरवात झाली. सन २०१९ नंतर पक्षी संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेडची संख्याही वाढली. गेल्या पाच वर्षांच्या काळात दोन वर्षे नफा, यंदाचे वर्ष नुकसान अशी स्थिती आली. मात्र केलेली गुंतवणूक व व्यवस्थापन पाहता खर्च कमी करून नफा मिळवण्याच्या अन्य बाबींकडे लक्ष द्यायचे पवन यांनी ठरविले आहे.

सध्याचा पोल्ट्री व्यवसाय- ठळक बाबी

-सध्या १५ हजार व सातहजार पक्षी क्षमतेचे दोन शेडस.

-विविध कंपन्यांकडून एक दिवसाची पक्षी घेण्यात येतात. त्याचे १८ ते २० आठवड्यांपर्यंत संगोपन करावे लागते. त्यावेळी पक्षांचे वजन १४०० ग्रॅम पर्यंत होते. त्यावेळी पक्षी अंडी देण्यास सुरवात करतात.

-प्रति दिन १२ हजार ते १३ हजार संख्येने अंडी उत्पादन.

विक्री व्यवस्था

पवन यांच्या सासऱ्यांचा व्यापाऱ्यांशी संबंध होताच. त्याच माध्यमातून बाजारपेठ मिळविण्यात पवन यांना यश आले. अंड्यांच्या दरात सातत्याने चढउतार होत असतात. कधी प्रति नग साडेतीन रुपये तर कधी साडेचार ते पाच रुपये असा दर अंड्यांना मिळतो. त्यासाठीचा उत्पादन खर्च साडेतीन ते साडेचार रुपयांच्या घरातही जातो. सध्या पशुखाद्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने दर साडेचार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मिळाला तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो असे पवन म्हणतात. मजुरी, वीज व अन्य बाबींचाही खर्च महत्त्वाचा असतो. बाहेरून खाद्य विकत घेण्यापेक्षा

प्रति दिन १० टन क्षमतेची फीडमीलही उभारली आहे. मात्र रोजची गरज सुमारे दोन टनांची असते. सण, उत्सव आणि श्रावण महिन्यात अंड्यांची मागणी कमी होते. त्यामुळे दर देखील घसरतात. त्याचा फटका बसतो. परंतु व्यवसायात खंड देता येत नाही. नुकसान सोसूनही त्यात सातत्य राखावे लागते. अंड्यांच्या दरात तेजी आल्यानंतर नुकसान भरूनही निघते असे पवन सांगतात. व्यापाऱ्यांच्या हाती दर असल्याने येत्या काळात बॉक्स पॅकिंगमधून अंडी विक्री सुरू करणार आहे. त्यामुळे स्वतःला दर ठरवणे शक्य होईल असे ते सांगतात.

देशी गोसंगोपनाचा आधार (चौकट २)

पोल्ट्रीला देशी गोपालनाचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा पर्यायी आधार दिला आहे. दोन वर्षांपूर्वी गुजरातमधून गीर गायी आणल्या आहेत. सध्या गोठ्यात सुमारे २२ गायी आहेत.

प्रति गाय पाच, सहापासून ते सात लिटरपर्यंत दूध मिळते. प्रति दिन एकूण संकलन १०० लिटरपर्यंत

पोचते. अमरावती शहरात ५० ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. त्यांना प्रति लिटर ६५ रुपये दराने घरपोच पुरवठा होतो. ग्राहक तयार करण्यासाठी व्हॉट्स ॲप ग्रुपचा उपयोग केला. त्या माध्यमातून मागणी वाढली. हिरव्या चाऱ्याची सोय शेतातच केली आहे. या व्यवसायातून सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा होतो.

शेतीचा विकास

दोन्ही पूरक व्यवसायांना शेतीचीही भक्कम जोड देत उत्पन्नाचा तिसरा पर्यायी स्रोत उभारला आहे.

सुमारे १२ एकरांत आठ एकर लिंबू व चार एकर आंबा (केशर) आहे. तर उर्वरित क्षेत्रात

कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी हंगामी पिके घेण्यात येतात. शेतीचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे रासायनिक निविष्ठांवर होणारा अनावश्‍यक खर्च वाचतो.

पवन लुंगे- ९८६०७१७६७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT