Team Agrowon
चांगल्या व उच्च दर्जाच्या पिलांच्या निवडीवर कुक्कुटपालनाचा नफा अवलंबून असतो. त्यामुळे पिलांची खरेदी ही उच्च दर्जाच्या अंडी उबवणूक केंद्रातून करावी.
पिलांची निवड करण्यापूर्वी सदरील अंडी उबवणूक केंद्रास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा तेथील केंद्राबद्दल माहिती घ्यावी. त्यानंतरच खरेदी करावी.
पिलांची वाढ जलद होणारी असावी. पिले उत्तम रोग-प्रतिकारक क्षमता असलेली असावीत.
स्नायू मांसल व पुष्ट असावेत. खाद्याचे मांसात जास्त व लवकर रूपांतर करण्याची क्षमता असावी.
मरतुकीचे प्रमाण कमी असावे.
पिलांना त्यांच्या वयोमानानुसार जागा पुरवणे गरजेचे आहे.
सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी डीप लिटर पद्धतीमध्ये कोंबड्यांना सुरुवातीचे तीन आठवडे वयापर्यंत अर्धा चौरस फूट जागेची गरज असते.